Authored by पवन येवले | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Dec 2022, 5:06 pm

Nashik News : नाशकातील बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील सैन्य दलात असलेले वीर जवान सारंग अशोक अहिरे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आलं आहे. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

 

Nashik Baghlan Sarang Ahire martyred
नाशकातील जवानाचे आसाममध्ये निधन, सुट्टीवर येण्यापूर्वी सारंग अहिरेंवर काळाचा घाला

हायलाइट्स:

  • बागलाण तालुक्यातील जवान सारंग अहिरे यांना वीरमरण
  • सारंग अहिरे यांना आसाम येथे कर्तव्यावर असताना वीरमरण
  • उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत
नाशिक : बागलाण तालुक्यात असलेल्या जायखेडा येथील रहिवासी भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले वीर जवान सारंग अशोक अहिरे (वय ३२) यांचा असाम येथे कर्तव्यावर असताना वीरमरण आलं आहे. याबाबतचे वृत्त समजताचं संपूर्ण बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली. रविवारी रात्री कुटुंबीयांना दूरध्वनीद्वारे ते कर्तव्यावर असताना वीरमरण आल्याची बातमी कळवण्यात आली. हे वृत्त समजतात त्यांच्या कुटुंबीयांसह मित्र परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला. वीर जवान सारंग यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सारंग अहिरे हे भारतीय सैन्य दलात १०३ इंजिनियरकडे गेल्या ११ वर्षांपासून कार्यरत होते.

सारंग अहिरे आसाममध्ये कर्तव्यावर असताना त्यांचं असं जाण्याने अहिरे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सारंग अहिरे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, भावजयी असा परिवार आहे. सारंग अहिरे यांचे पार्थिव आज मंगळवारी दुपारपर्यंत बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे पोहोचण्याचा अंदाज असून त्यांना गावातच शासकीय इतमातात अखेरचा निरोप दिला जाणार आहे. उद्या सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

महाराष्ट्र केसरी होणार पुण्यात, मात्र नगरमध्ये रंगली राजकीय कुस्ती
जायखेडाचे भूमिपुत्र असलेले वीर जवान सारंग अशोक अहिरे हे कर्तव्यावर असताना त्यांचा झालेला मृत्यू दुःखद आहे. जवान सारंग अहिरे यांनी अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून आपले शिक्षण पूर्ण केलं. ते भारतीय लष्करात १९व्या वर्षी कार्यरत झाले होते. त्यांनी १०वी पर्यंतचे शिक्षण जायखेडा जनता इंग्लिश स्कूलमध्ये घेतल्यानंतर १२वीचे शिक्षण ताराबाद येथे पूर्ण करून सैन्य दलात भरती झाले आणि पुणे येथे त्यांच्या देश सेवेला प्रारंभ झाला. सारंग अहिरे हे गेल्या तीन महिन्यांपूर्वी आपल्या घरी आले होते. त्यानंतर ते परत ५ जानेवारीला सुट्टीवर घरी येणार होते. त्यापूर्वी त्यांना कर्तव्यावर असताना विरमरण आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या सुटकेचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने CBIची विनंती फेटाळली

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here