नवी दिल्ली: राजस्थान राजकीय संकट प्रकरणात () दररोज नवे वळण मिळत आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत (CM Ashok Gehlot) यांच्या विरोधात बंडखोरी करत आपली वेगळी वाट चोखाळू पाहणारे () यांनी आमदार (Giriraj Singh Malinga) यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. गिरिराजसिंह यांनी माफी मागावी आणि एक रुपया दंड द्यावा अशी मागणी सचिन पायलट यांनी या नोटीशीद्वारे सांगितले आहे. जर गिरिराजसिंह यांनी येत्या ७ दिवसांत माफी मागितली नाही, तर आपण
नागरी आणि गुन्हेगारी बदनामीचा गुन्हा दाखल करू, असा इशाराही पायलट यांनी दिला आहे.

आपल्याला भारतीय जनता पक्षात येण्यासाठी ३५ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोप बहुजन समाज पक्षातून काँग्रेसमध्ये आलेले आमदार गिरिराजसिंह मलिंगा यांनी सचिन पायलट यांच्यावर आरोप केला आहे. मात्र, आपण आमदार मलिंगा यांच्याविरोधात उचित आणि कडक कारवाई करू असे सचिन पायलट यांनी म्हटले होते. अशा प्रकारचा आरोप झाल्याचे पाहून आपण अतिशय दु:खी असून या आरोपाचे आपल्याला आश्चर्यही वाटत असल्याचे सचिन पायलट यांनी म्हटले होते. याद्वारे मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार म्हणजे मुख्य विषयापासून दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न असल्याचेही सचिन पायलट यांचे म्हणणे आहे.

वाचा:

मी हे मुद्दे वारंवार उचलच राहणार असून या प्रकरणी कायदेशीर कारवाई करेन असे पायलट म्हणाले होते. मी माझ्या मतावर ठाम असून माझ्यावर मनात येतील ते आरोप लावले जात आहेत. स्वत: सचिन पायलट यांनी आपल्याला भाजपत प्रवेश करण्यासाठी ३५ कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला, असा थेट आरोप गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये आलेले माजी बहुजन समाज पक्षाचे आमदार गिरिराजसिंह मलिंगा यांनी सचिन पायलट यांच्यावर लावला होता. मात्र आपण ही ऑफर नाकारली असे मलिंगा यांचे म्हणणे आहे.

वाचा:
हा प्रकार डिसेंबर महिन्यापासून सुरू असून ही गोष्ट नवी नाही, असे मलिंगा यांचे म्हणणे आहे. मी असे काहीही करू सकत नाही असे आपण सचिन पायलट यांना स्पष्टपणे सांगितल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपण सचिन पायलट यांच्याशी चर्चा केली असून मला किती रुपये हवेत असे मला त्यांनी विचारले. नंतर त्यांनी मला ३५ कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली. अशाच कारणांमुळे मी बहुजन समाज पक्ष सोडला होता. मी जर काँग्रेस सोडला तर जनतेला काय सांगू, असेही मलिंगा यांनी म्हटले आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here