रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अँटीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या करोना रुग्णाचा दापोली उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या रुग्णाला दमा व अस्थमाचा आधीपासून त्रास होता व काल रात्रीपासून या रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, या रुग्णाची अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असली तरी आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल उद्या रात्रीपर्यंत मिळण्याची शक्यता जिल्हा शल्यचिकित्सक संघमित्रा फुले यांनी वर्तवली आहे. दरम्यान, लोकांनी घाबरू नये तसेच जिल्ह्यात करोनाचा नवीन व्हेरिएंट दाखल झाला आहे का? हे आरटीपीसीआर अहवालानंतर स्पष्ट होईल, असे आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडळ तालुक्यात पहिला रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मंडणगड तालुक्यात पाल्ये गावातील रुग्णाची अँटिजिन टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर आली आहे. सध्या तरी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही पण काळजी घेणे आवश्यक आहे. मृत्यू झालेला रुग्ण हा मंडणगड पाल्ये येथील असून त्याची कोणतीही प्रवासाची पार्श्वभूमी नसल्याची माहिती आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्याला खोकला, दमा, सर्दी याचा त्रास सुरु होता.

सत्तारांच्या राजीनाम्यावर विरोधी पक्षाचे मौन; सत्ताधारी पक्षासोबत समझोता झाल्याची चर्चा

दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हयातील चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालय प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मनसेप्रमुखांचं ते पत्र वसंत मोरेंसाठीच? पण पुण्यात वेगळंच दृश्य, तात्या राज ठाकरेंना म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here