Sahyadri Farms Nashik : केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीला (Sahyadri Farmers Producer Co Ltd) भेट दिली. यामध्ये कृषी मंत्रालयाचे सचिव मनोज अहुजा (Manoj Ahuja) आणि अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी आणि फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार हे अधिकारी होते. या अधिकाऱ्यांनी सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीतील सदस्य शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांनाही भेट दिली. यावेळी शेतकऱ्याकडून त्यांनी दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी आवश्यक कृषी पद्धती आणि इतर महत्त्वाच्या घटकांची माहिती जाणून घेतली. सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. 

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितल्या समस्या 

बियाणांपासून ते उत्पादन तंत्रज्ञान आणि बाजारापर्यंत शेतकरी एकत्र येत आहेत. ‘सह्याद्री’ च्या माध्यमातून असे पूर्ण मुल्यसाखळीचे मॉडेल उभे राहिलल्याचे कृषी मंत्रालयाचे सचिव मनोज अहुजा म्हणाले. उत्तम दर्जाच्या द्राक्षांचे उत्पादन घेताना आलेले अनुभव सदस्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तसेच हवामानाच्या अनियमिततेमुळं उद्भवणाऱ्या समस्या देखील कथन केल्या. महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रमाणात द्राक्षांचे उत्पादन होते. नाशिक हा राज्यातील सर्वात मोठा द्राक्ष उत्पादक जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे.

सह्याद्री भेटीत अधिकाऱ्यांनी काय काय केलं

  • देशातील आघाडीची शेतकरी उत्पादक कंपनी आणि द्राक्षांची सर्वात मोठी निर्यातदार असलेल्या सहयाद्री शेतकरी उत्पादक कंपनीची कार्यपद्धती जाणून घेतली. 
  • समूह विशिष्ट हस्तक्षेपांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांशी संवाद साधला. 
  • देशांतर्गत आणि निर्यात बाजारातील स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी  एकात्मिक पद्धतीने  उत्पादन पूर्व घटक, उत्पादन, काढणी पश्चात व्यवस्थापन आणि मूल्यवर्धन तसेच मालवाहतूक, विपणन आणि ब्रँडीग या  फलोत्पादन मूल्यसाखळीतील समस्यांवर तोडगा शोधणे.
  • सह्याद्री भेटीच्या पहिल्या सत्रात आहुजा यांनी शेतकरी गणेश कदम यांच्या शेतास भेट देत शेतीत वापरत असलेले आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेतले.
  • सह्याद्रीची अत्याधुनिक माती, पाणी, पानदेठ प्रयोगशाळा, कपडा उत्पादनाचा आरयू उद्योग, शेतकरी सुविधा केंद्र, आयात केलेल्या नव्या वाणांचे प्रक्षेत्र यांची पाहणी केली.
  • सह्याद्रीच्या एफपीसी इन्क्युबेशन सेंटर मध्ये सुरु असलेल्या प्रशिक्षणाची माहिती घेतली
  • प्रशिक्षणार्थी संचालकांचे अनुभव जाणून घेतले.
  • 2022/12/28/5f163a3bc21849f3f9bfc80846f29a711672205434540339_original.jpg” width=”566″ height=”491″ />

सह्याद्रीच्या माध्यमातून उद्योजकांचे जाळे उभे राहिले

सर्व अधिकाऱ्यांनी, चितेगाव, नाशिक येथे कांदा आणि लसूण आणि एनएबीएल  मान्यताप्राप्त कीटकनाशक अवशेष विश्लेषण प्रयोगशाळेला भेट दिली.  सह्याद्रीच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. केवळ शेतकरीच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान तयार करणारे तंत्रज्ञ, तरुण उद्योजक यांचेही जाळे उभे राहिले आहे ही विशेष कौतुकास्पद बाब आहे. देशभरातील शेतीत या बाबींचा समावेश होणे आवश्‍यक असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.

News Reels

शेतकरी उत्पादक कंपन्यांची महत्त्वपूर्ण भूमिका

केवळ शेतीतील ताजे उत्पादन विक्री करण्यापर्यंतच न थांबता त्याचे मुल्यवर्धन करण्यावर सह्याद्रीने आणि त्यांच्याशी जोडलेल्या स्टार्ट कंपन्यांनी भर दिला आहे. ही काळाची गरज आहे. या सगळ्यांशी आपल्या राष्ट्रीय संशोधन केंद्र, आयसीएआर या सारख्या शासनाच्या संस्थाही जोडलेल्या आहेत. या परस्परांत तंत्रज्ञानाचे सामंजस्य करार होताहेत. हेच शेतीचे भवितव्य आहे. अशा काळात शेतकरी उत्पादक कंपन्या खूप महत्वपूर्ण भूमिका बजावू शकतात अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या:

Sahyadri Farms : नऊ पिके, 18 हजार शेतकरी, 31 हजार एकर क्षेत्र, सह्याद्री फार्म्समध्ये 310 कोटींची परकीय गुंतवणूक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here