सांगली: वन्यजीव कायद्यानुसार जिवंत साप पकडून त्यांची पूजा करणे गुन्हा असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यंदाही बत्तीस येथे नागपंचमीला होणार नाही. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिराळ्यातील अंबामाता मंदिर बंदच राहणार आहे. जिवंत नागांची पूजा करू नये, तसेच स्पर्धा भरवू नये यासाठी विशेष नजर ठेवण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. याबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. ( )

वाचा:

निमित्ताने जिवंत नागांना पकडून त्यांचे पूजन आणि स्पर्धा भरवण्याची प्रथा येथे होती. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रथेवर बंद घातल्याने नागपंचमीला काही ठिकाणी छुप्या पद्धतीने जिवंत नागांची पूजा करण्याचा प्रयत्न केला जातो. असे प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. अपर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी बुधवारी वन विभागाचे उप वनसंरक्षक पी. बी. धनके, उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, शिराळा नगराध्यक्षा अर्चना शेटे, आदींच्या उपस्थितीत बैठक घेतली. या बैठकीत उच्च न्यायालयाच्या आदेशांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

वाचा:

नागपंचमीला जिवंत नागांची पूजा होऊ नये, तसेच स्पर्धा होऊ नयेत यासाठी जिल्हा प्रशासनाकडून चित्रीकरण केले जाणार आहे. शहरातील सीसीटीव्ही कमेऱ्यांवरूनही नजर ठेवली जाणार आहे. आवश्यकतेनुसार शिराळ्यासह परिसरात संचारबंदी लागू केली जाईल. कोणाकडे जिवंत साप आढळल्यास दोषींना तीन वर्षांपर्यंत कैद आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा होईल, असे कदम यांनी बैठकीत सांगितले. बैठकीसाठी शिराळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी योगेश पाटील, सहायक वन संरक्षक जी. आर. चव्हाण यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.

वाचा:

आठ वर्षांपासून मिरवणुकांवर बंदी

नागपंचमीपूर्वी आठ-दहा दिवस परिसरातून नाग पकडले जात होते. यानंतर नागपंचमीला त्यांचे पूजन करून मिरवणूक काढली जात असे. यावेळी नागांच्या स्पर्धाही आयोजित केल्या जायच्या. या स्पर्धा पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक बत्तीस शिराळ्यात दाखल होत असत. मिरवणूक संपल्यानंतर सर्व नाग पुन्हा जंगलात सोडले जात होते. मात्र, नागांचे होणारे हाल थांबवण्यासाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते अजित पाटील यांनी सन २००२ मध्ये पहिल्यांदा याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. २०१२ मध्ये मुंबई हायकोर्टाने जिवंत नागांचे पूजन, मिरवणूक आणि खेळांवर बंदी घातली. या निर्णयानंतर शिराळ्यात मातीच्या नागाच्या प्रतिकृतीचे पूजन केले जाते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here