शालेय शिक्षण झाल्यानंतर कुसूमनं पुढील अभ्यासाची तयारी घरीच राहून सुरू केली. यावेळी तिचा महाविद्यालयीन प्रवेश होऊ शकला नाही. त्यामुळे पुढील प्रवेश ती प्रवेश घेणार होती. यादरम्यान कुसूमनं शाहबादसोबतचा संवाद हळूहळू कमी केला. शाहबाद सध्या गुजरातच्या अहमदाबादमधील एका कंपनीत काम करतो. शाहबाद कुसूमला अनेकदा फोन करायचा. मात्र तिचा फोन बिझी असायचा. त्यामुळे शाहबादला संशय आला. पत्थलगावातील आशीष केरकेट्टाशी कुसूमचे संबंध असल्याचा संशय शाहबादला होता. त्यावरून त्यानं कुसूमला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली होती. आशिष कुसूमचा नातेवाईक होता. त्याचं कुसूमच्या घरी येणं जाणं होतं.
शाहबादनं कुसूमला ठार करण्यासाठी कट रचला. त्यासाठी त्यानं गुजरातहून विमानानं कोरबा गाठलं. कोरबा येथे पोहोचल्यानंतर त्यानं कुसूमशी संपर्क साधला. २४ डिसेंबरला कुसूमनं त्याला घरी बोलावलं. शाहबादनं कुसूमशी शरीरसंबंध ठेवले. त्यानंतर स्क्रू ड्रायव्हरनं तिच्यावर ५१ वार केले. कुसूमनं आरडाओरडा करू नये म्हणून त्यानं तिच्या तोंडावर उशी ठेवली. हत्येनंतर आरोपीनं स्वत:चा फोन स्विच्ड ऑफ केला आणि तिथून पळ काढला.
आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलीस अधिकारी रुपक शर्मांनी सांगितलं. घटनास्थळी मिळालेले पुरावे, मोबाईल, व्हॉट्स ऍप कॉल्सचा तपशील यांच्यावरून हा प्रकार लव्ह ट्रँगलमधून घडला असावा. घटना घडण्याच्या २ दिवसांपूर्वी आरोपी गुजरातहून रायपूरला विमानानं आणला होता. त्यानंतर त्यानं बसनं कोरबा गाठलं. मग तो शहरातील एका हॉटेलात थांबला. तिथून तो व्हॉट्स ऍप कॉलच्या माध्यमातून तरुणीच्या संपर्कात होता, अशी माहिती शर्मांनी दिली.