जयपूर: पत्नी माहेरी गेल्याने नाराज असलेल्या एका तरुणाने बेकायदेशीर शस्त्राने पोटात गोळी झाडून आत्महत्या केली. राजस्थानच्या धौलपूर जिल्ह्यातील बसई डांग पोलीस स्टेशन हद्दीतील बारीपुरा गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. गोळी लागल्याने हा तरुण गंभीर जखमी झाला असून कुटुंबीयांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, जखमी तरुणाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला उपचारासाठी हायर सेंटरला पाठविण्यात आले. बसई डांग पोलीस स्टेशनचे एसएचओ मोहन सिंह यांनी सांगितले की, बारीपुरा गावातील रहिवासी असलेला २८ वर्षीय गजराजचा मुलगा रामजीलाल गोळी लागल्याने जखमी झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा –

पत्नी माहेरी गेल्याने नाराज पतीचं भयंकर कृत्य
दरम्यान, जखमी तरुणाला घेऊन नातेवाईक दुचाकीवरून धौलपूर रुग्णालयाकडे रवाना झाले. ज्यांना ८ मैल पोस्टवर थांबवून चौकशी केली असता तरुणाची प्रकृती गंभीर आढळून आली. यानंतर पोलिसांच्या मदतीने तरुणाला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून डॉक्टरांनी त्यांना उपचारासाठी हायर सेंटरला पाठवले आहे. एसएचओ सिंह यांनी सांगितले की, तरुणाच्या कुटुंबीयांशी या घटनेबाबत चर्चा केली असता, गजराज या तरुणाचे एक वर्षापूर्वी लग्न झाल्याचे समजले.

हेही वाचा –

गावात पोहोचल्यानंतर पोलिसांनी अवैध कट्टा जप्त केला

तरुणाला अंमली पदार्थांचे व्यसन लागल्याने त्याची पत्नी दोन महिन्यांपूर्वी माहेरी गेली. पत्नी माहेरी गेल्याने संतापलेल्या तरुणाने स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यानंतर पोलिसांनी गावात पोहोचून घटनास्थळावरून अवैध देशी कट्टा जप्त केला.

हेही वाचा –

1 COMMENT

  1. Reading your article helped me a lot and I agree with you. But I still have some doubts, can you clarify for me? I’ll keep an eye out for your answers.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here