रांची : एका करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही अभिनेत्री झारखंडची असून तिची बंगालमध्ये हत्या झाली आहे. २२ वर्षीय अभिनेत्री रिया कुमारी उर्फ ईशा आलियाची पश्चिम बंगालच्या हावडामध्ये हत्या झाली आहे. रांची-कोलकाता मार्गावर बुधवारी सकाळी तिच्यावर गोळी झाडण्यात आली होती.
अभिनेत्री रियाची हत्या
मिळालेल्या माहितीनुसार, रिया तिचा पती प्रकाश कुमार आणि तीन वर्षांच्या मुलीसह कोलाकाताकडे निघाली होती. रियाचा पती प्रकाश कुमारने दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावरील दरोडेखोरांनी तिची हत्या केली आहे. मात्र, पोलीस याकडे संशयास्पद म्हणून पाहत आहेत. रियाचा पती प्रकाश याची चौकशी सुरू आहे. रिया कुमारी झारखंडमध्ये ईशा आलियाच्या नावाने ओळखली जाते. खोरठा आणि प्रादेशिक भाषांच्या अल्बममध्ये तिने काम केलं आहे.