जयपूर: राजस्थानच्या हनुमानगढमध्ये एका विद्यार्थ्यानं कीटनाशक पिऊन आत्महत्या केली आहे. गेल्या ६ दिवसांपासून तो बेपत्ता होता. कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. बेपत्ता विद्यार्थ्याचा मृतदेह पोलिसांना सिंचन विभागाच्या रिकामी असलेल्या खोलीत आढळून आला. कन्हैयालाल असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. त्याच्या जवळ कीटकनाशकाची रिकामी बाटली सापडली. बॅगेत एक सुसाईड नोट सापडली.

वडिलांच्या नावानं पत्र लिहून कन्हैयालालनं जीवन संपवलं. ‘सॉपी पापा, माझ्याकडे आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. मी जातोय. तुम्ही स्वत:ची आणि सगळ्यांची काळजी घ्या. अनिल आणि सुनील दोन्ही भाऊ चांगले आहेत. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय. पण मी काहीच करू शकलो नाही,’ अशा शब्दांत वडिलांसाठी पत्र लिहून कन्हैयालालनं आयुष्य संपवलं.
महिलेच्या मागे लागला, पण भाव देईना; तरुणाकडून स्फोटकं भरलेला मिक्सर गिफ्ट; स्फोट झाला, पण…
कन्हैयालालनं एकदा रीट परीक्षा दिली होती. त्यात त्याला १३५ गुण मिळाले. यावेळी आपल्याला नोकरी मिळेल असा विश्वास त्याला होता. मात्र परीक्षा रद्द झाली. त्यानंतर त्यानं वनपाल पदाची परीक्षा दिली. मात्र ती परीक्षाही रद्द करण्यात आली. त्यानंतर कन्हैयालालनं पुन्हा रीट परीक्षेची तयारी सुरू केली. पण सतत परीक्षा रद्द झाल्यानं तो तणावाखाली होता.

तणावाखाली कंटाळून कन्हैयालालनं कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. २४ डिसेंबरला कन्हैयालालचा वरिष्ठ शिक्षक भरतीचा सामान्यज्ञानाचा पेपर होता. मात्र परीक्षेआधीच त्यानं जीवनप्रवास थांबवला. विशेष म्हणजे हा पेपरही लीक झाला. कन्हैयालालचा मोठा भाऊ धर्मपाल सरकारी शिक्षक आहे.
प्रेयसी कॉल घेईना, फोन सतत बिझी! संतप्त प्रियकर विमानानं भेटीसाठी गेला अन् तब्बल ५१ वेळा…
सरकारी नोकरी मिळत नसल्यानं, परीक्षा सातत्यानं रद्द होत असल्यानं कन्हैयालालनं आत्महत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं. परीक्षा रद्द होत असल्यानं तो तणावाखाली होता. त्यामुळेच त्यानं टोकाचं पाऊल उचललं. दोन वर्षांपूर्वी त्याचा विवाह झाला होता. कन्हैयालालच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

2 COMMENTS

  1. Very nice post. I just stumbled upon your blog and wanted to say that I’ve really enjoyed browsing your blog posts. In any case I’ll be subscribing to your feed and I hope you write again soon!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here