लहान वयापासूनच सेलेनाने यशाची पायरी चढली. सेलेनेचा जन्म २२ जुलै १९९२ मध्ये अमेरिकेत झाला. वयाच्या १७ व्या वर्षी ती यूनिसेफची अॅम्बेसिडरही होती. सेनेनाने तिच्या करिअरची सुरुवात ‘बारनी अँड फ्रेंड्स’ मधील ‘गियाना’ने केली. करिअरच्या सुरुवातीला तिने हॅना मोंटेनामध्येही काम केलं होतं. यानंतर सेलेनाने अनेक सिनेमांमध्ये छोटेखानी भूमिका साकारल्या होत्या. याच भूमिकांमुळे सेलेनाला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळाली. आज वयाच्या २८ व्या वर्षी सेलेना अब्जाधीश आहे.
जस्टिन बीबरसोबत रिलेशनशिपमध्ये असलेल्या सेलेनाचं काही वर्षांनी ब्रेकअप झालं. यानंतर जस्टिनने हॅली बाल्डविनशी लग्न केलं. सेलेना सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सेलेनाने एखादा फोटो इन्स्टाग्रामवर टाकला आणि तो व्हायरल झाला नाही असं होऊच शकत नाही. जगभरात तिचे कोट्यवधी चाहते आहेत.
काही वर्षांपूर्वी सेलेनाचं किडनी ट्रान्सप्लान्ट झालं आणि यामुळे तिला काही अडचणींचा सामना करावा लागला होता. गोमेजला डिझ्नी शो ‘विजर्ड ऑफ वेवर्ली प्लेस’ या शोमधून बालकलाकार म्हणून ओळख मिळाली होती. तिच्या ‘कम अँड गेट इट’, ‘द हार्ट वॉन्ट्स वॉट इट वॉन्ट्स’, ‘बेड लायर’, ‘वुल्फ’ आणि ‘बॅक टू यू’ ही गाणी तिच्या चाहत्यांमध्ये आजही प्रसिद्ध आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times