मोबाईलचा हफ्ता भरला नाही म्हणून फायनान्स कंपनीचा गुंड आणि त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी भरबाजारात दांडे आणि कमरेच्या बेल्टने दोन भावंडांना मारहाण केली. त्यातील एक बेशुद्ध पडला तर दुसरा दयेची भीक मागत होता. मात्र तरीही टोळक्याकडून मारहाण सुरूच होती. आज दुपारी शहरातील गजबजलेल्या कॅनॉट गार्डन भागात ही घटना घडली आहे.

काही वेळाने फायनान्स कंपनीच्या वसुली करणाऱ्या तरुणाने आठ ते दहा जण बोलावून घेतले. त्यावेळी अनिकेत आणि अभिषेक दोघेही कॅनॉटमध्ये उभे होते. दोन्ही भावांवर आठ ते दहा जणांच्या टोळक्याने हल्ला चढवला. त्यांच्या हातात कंबरेचे बेल्ट, दांडे होते. दोन्ही भावांना रस्त्यावर पाडून आठ ते दहा जणांनी निर्दयीपणे मारहाण केली. टोळक्याच्या मारहाणीत अनिकेत बेशुद्ध पडला. तरीदेखील त्याला मारहाण सुरूच होती.
अभिषेक हात जोडून दयेची भीक मागत होता. तरीही कुणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. काही स्थानिक व्यापाऱ्यांनी मध्यस्थी करून दोघांना वाचवले. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी घटनस्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. पोलिसांनी दोन्ही जखमी भावांना रुग्णालयात हलवले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Thanks for sharing. I read many of your blog posts, cool, your blog is very good.