Pune congress bhavan Sharad pawar : कॉंग्रेसमुक्त (Congress) भारत करायचा आहे, असं काही लोक म्हणतात. मात्र कॉंग्रेसमुक्तभारत होऊ शकत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद (Sharad pawar) पवार यांनी केलं आहे. कॉंग्रेसच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी तब्बल 24 वर्षांनी शरद पवार यांनी पुण्याच्या कॉंग्रेस भवनात हजेरी लावली होती. त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातील (Pune) कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांना चहापानासाठी बोलावलं होतं. त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलं होतं. 24 वर्षांनी या वास्तुत ते येणार असल्याने त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
ते म्हणाले, कॉंग्रेसमुक्त भारत करायचा आहे, असं काही लोक म्हणतात. मात्र कॉंग्रेसमुक्त भारत होऊ शकत नाही. कॉंग्रेसची विचारधारा आणि योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. कॉंग्रेसच्या धोरणांबाबत मतभेद असतील, माझेही काही मतभेद आहेत, मात्र कॉंग्रेसला सोबत घेऊनच राजकारण करावे लागेल. मी सर्वात आधी 1958 ला या कॉंग्रेस भवनमधे आलो होते. त्याकाळी कॉंग्रेसमधे अनेक नेते कार्यरत होते. पुणे म्हणजे कॉंग्रेस आणि कॉंग्रेस म्हणजे पुणे असे समीकरण होते. स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसचे केंद्र इथे होते. महाराष्ट्र प्रदेशचा कारभार या वास्तुतून चालायचा. इथुन कॉंग्रेसच्या नेत्यांनी इंदिरा गांधीच्या माध्यमातून नेहरुंना कन्व्हीन्स केलं आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. त्यामधे पुण्यातील कॉंग्रेस भवनचे योगदान मोठे आहे, असं म्हणत त्यांनी कॉंग्रेस भवनाच्या आठवणींना उजाळा दिला.
मोदी, शहांना भेटणार…
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज तब्बल 13 महिन्यांनी जामीन मिळाला. त्यामुळे त्यांची आज जेलमधून सुटका झाली. अनिल देशमुखांच्या जामिनावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. आपल्या सहकाऱ्यांना खूप यातना सोसाव्या लागल्या. अशा प्रकारच्या यातना आणखी कुणावर सोसण्याची वेळ येऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याची त्यांनी स्पष्ट केलं आहे.सत्तेचा गैरवापर कसा होतो त्याचं हे उदाहरण आहे. अनिल देशमुख यांच्याबरोबर इतर कुणावर अत्याचार होऊ नये यासाठी गरज पडल्यास मोदींची भेट घेऊ, असंही ते म्हणाले.
मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्यावर रिव्ह्यू घ्यावा, अशी मागणी होतेय. पण आम्ही मागणी नाही करत आहोत. आम्ही संसदेत आहोत. त्यामुळे संसदेतील आणखी काही सहकाऱ्यांना घेऊन त्यासंबंधी काही योजना आणता येईल, तसा प्रयत्न तिकडे करायचा आहे. त्या कामाला आम्ही सुरुवात केली आहे, अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे.