Nashik: गोदाघाटावरील वारसा (Godavari River)स्थळांची हत्या केल्याचा आरोप करीत दोन आठवड्यांपूर्वी गोदाप्रेमी नाशिककरांनी (Nashik) आंदोलन केले होते. या पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी गोदकाठाची पाहणी केली. तुटलेला दगडी घाट, भंगलेली गणपती मूर्ती, पुरातन सांडवा आदी पुरातन वास्तूंचे बांधकाम त्याचबरोबर नवीन जुन्या दगडांचा वापर करून बांधण्यात येणार असल्याचे आश्वासन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी दिले.  

गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहरासह गोदाकाठावर (Godavari River) स्मार्ट सिटी (Smart City) प्रकल्पांतर्गत सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मात्र या कामासाठी सुरवातीपासूनच नाशिककरांसह गोदाप्रेमींचा विरोध होता. मात्र हा विरोध झुगारून कामे केली जात आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी येथील पुरातन पायऱ्या तोडण्यात आल्या. यावेळी पायऱ्या तोडण्याचे काम सुरू असताना आसपासच्या मंदिरांना तडे गेल्याचे समोर आले. अनेक मंदिराच्या मूर्तींना तडे गेल्याचे निदर्शनास आले. 

दरम्यान हे काम करत असताना सांडव्यावरील देवी मंदिर, मागील पुरायन सांडवा, यशवंतराव महाराज पटांगण जवळील पुरातन दगडी घाट,पायऱ्या उध्वस्त केल्या होत्या होता. यासह जवळच असलेल्या एका लहान दगडी मंदिरातील गणेश मूर्ती भंग पावली असून, येथील छोट्या छोट्या छोट्या मंदिरांना तडे गेले होते. याबाबत गोदाप्रेमी देवांग जानी  यांनी वेळोवेळी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून दिली होती. मात्र अधिकाऱ्यांनी दिलेली मुदत उलटूनही उध्वस्त वारसा स्थळांची कामे केली जात नसल्याने दोन आठवड्यांपूर्वी गोदाप्रेमी नाशिककरांनी एकत्र येत या वारसा स्थळांना श्रद्धांजली अर्पण करून अनोखे आंदोलन केले होते. 

दरम्यान आंदोलनाची दखल घेत स्मार्ट सिटीने बैठकीचे आयोजन करत आज रोजी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी गोदाकाठावर प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. त्यानुसार गोदाप्रेमी नाशिककरांच्या उपस्थितीत सुमित मोरे यांनी गोदाघाटावरील मंदिरांसह पायऱ्यांची पाहणी केली. यावेळी यशवंतराव महाराज पटांगण जवळील पुरातन दगडी घाटाचे बांधकाम नवीन जुन्या दगडांचा वापर करून केला जाणार असल्याचे ते म्हणाले. 

live reels News Reels

तसेच वाहून गेलेले दगड जमवून त्यातूनच दगडी घाटाचे बांधकाम करण्याच्या मागणीवर गोदाप्रेमी ठाम आहे. येथील गणेश मूर्ती भग्न झालेली असून लवकरच येथील मूर्ती नव्याने बसवून बसवून देणार असल्याचे सुमंत मोरे यांनी सांगितले. यानंतर सांडव्यावरील देवी मंदिर मागील पुरातन सांडवा स्मार्ट सिटीने काही एक विचार न करता तोडला असल्याचे गोदाप्रेमी यांनी पाहणी दौऱ्यात सांगितले. मोरे यांनी या ठिकाणी नव्याने सांडवा बांधण्यासाठी स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांना सूचना केला. गोदाघाटावरील उध्वस्त वारसा स्थळांचे बांधका‘ पुढील दोन तीन दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी सांगितले. 

पुरातन दगडी घाट तोडला गेल्यानंतर घाटाचे दगड पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याने एकाच दगडात हे बांधकाम कसे केले जाणार असा प्रश्न गोदाप्रेमी यांनी उपस्थित केला. यावर स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी राजस्थान येथील बेसाल्ट दगडात केल्यानंतर हे काम कशाप्रकारे दिसेल याचे प्रात्यक्षिक दगडी फरशी लावून दाखवले. तसेच पुरातन सांडवा बांधकाम करण्यासाठी गोदापात्र कोरडे केले जाणार असल्याचे स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच गोपाबाई तास येथील दगडी पायऱ्या तशाच ठेवण्यात येणार असून त्याची विशेष पद्धतीने स्वच्छता करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गोदापात्रात सापडलेल्या दगडी कासवाची प्रतिकृती चांगली बनवून त्याचे जतन केले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नवीन दगडांचा वापर करून प्राचीन घाट तयार करणार असल्याचे हास्यास्पद उत्तर स्मार्ट सिटीचे अधिकारी देत आहेत नव्या आणि जुन्या दगडांचा मेळ बसणार नसून घाट हा घोडा बैल अशा जोडीसारखा दिसेल. त्यासाठी वाहून गेलेले दगड पात्रातच असतील किंवा मजुरांनी वाहून नेले असतील. त्या जुन्या दगडांचा शोध घेऊन आहे, तसा प्राचीन घाट तयार करावा, अशी मागणी गोदाप्रेमी सेवा समितीचे देवांग जानी यांनी केली आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here