रत्नागिरी: रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला आणण्यासाठी गेलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांवर तसेच त्यानंतर आलेल्या पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना परिसरात घडली आहे. ( In Ratnagiri )

वाचा:

येथील साखरीनाटे भागात सोमवारी दोन करोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. पैकी एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गावातील आणखी एकाचा करोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यावर या रुग्णाला आणण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांचे एक पथक रुग्णवाहिका घेवून तिथे गेले होते परंतु तेथे जमलेल्या लोकांनी त्यांना रोखले व रुग्णाला नेण्यास विरोध केला. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी पोलिसांची मदत घेतली.

वाचा:

घटनास्थळी पोलीस आल्यानंतरही जमावाने आपला विरोध कायम ठेवला व पोलिसांशीही हुज्जत घातली. त्यातून काही वेळातच हे प्रकरण चिघळत गेले आणि जमावाने कर्मचारी व पोलिसांवरही हल्ला केला. यावेळी शासकीय वाहनांवर दगडफेकही करण्यात आली. यामध्ये पोलिसांच्या गाडीच्या काचा तुटल्या आहेत. तसेच एका आरोग्य कर्मचाऱ्यालाही दुखापत झाल्याचे कळत आहे. गावागावात करोना रुग्ण सापडत असल्याने चिंतेचे वातावरण असताना करोना योद्ध्याचे काम बजावणाऱ्या यंत्रणेवरच हल्ले होत असल्याने आता चिंतेचे वातावरण बनले आहे.

वाचा:

रत्नागिरीत ४९९ अॅक्टिव्ह रुग्ण

रत्नागिरीत मंगळवारी प्राप्त अहवालांमध्ये ४७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १३०९ झाली होती. दरम्यान १९ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले होते. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७६८ झाली आहे. मंगळवारी जिल्हा कोविड रुग्णालय १, संगमेश्वर २, कोविड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली येथे १५ आणि कामथे येथे एक रुग्ण करोनामुक्त झाला. तर साखरीनाटे (राजापूर) येथील एका ६५ वर्षीय करोना बाधित रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या आता ४२ झाली आहे. सध्या जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४९९ आहे.

वाचा:

कंटेन्मेंट झोन

जिल्ह्यात सध्या १०५ ॲक्टिव्ह कंटेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात २३ गावांमध्ये, दापोलीमध्ये ७ गावांमध्ये, खेडमध्ये २४ गावांमध्ये, लांजा तालुक्यात ६, चिपळूण तालुक्यात ३३ गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात ३, गुहागर तालुक्यात ६ आणि राजापूर तालुक्यात ३ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण

शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – ६८, कोविड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – १, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – १६, कोविड केअर सेंटर पेढांबे- ७, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी -३, कोविड केअर सेंटर, घरडा, लवेल – २, केकेव्ही, दापोली – १२ असे करोना सदृष्य लक्षणे असलेले १०९ रुग्ण दाखल आहेत.

होम क्वारंटाइन

मुंबईसह एमएमआर क्षेत्र तसेच इतर जिल्हयांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. सध्या होम क्वारंटाइन खाली असणांऱ्यांची संख्या १५ हजार ५१० इतकी आहे.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here