सिंधुदुर्ग: शिक्षा भोगून आलेले सात कैदी स्वतःच्या पायावर उभे राहून छोटे व्यावसायिक बनले आहेत.ही किमया जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या साहाय्याने साकारली गेली. परिविक्षाधीन व शिक्षा भोगून आलेल्या मुक्त बंध्यांचे समाजात पुनर्वसन करण्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान दिले जाते.या योजनेचा लाभ सिंधुदुर्गातील पाच परिविक्षा आणि दोन मुक्तबंदी अशा सात जणांनी घेतला आहे. सातही जण आपला व्यवसाय उत्तमरीत्या उभारून चरितार्थ चालवत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी परिविक्षा अधिकारी या कैद्यांना रोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन करीत असतात. जिल्ह्यातील परिविक्षाधीन अश्विनी चोपडेकर यांनी शिवणकाम, दिगंबर म्हापणकर यांनी कुक्कुटपालन आणि गणपत म्हापणकर यांनी वेल्डिंग व्यवसाय सुरू केला आहे.तसेच मुक्तबंदी लक्ष्मण न्हावी यांनी केश कर्तनालय तर शरद हरमलकर यांनी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.

यावेळी बोलताना दिगंबर म्हापणकर म्हणाले, माझ्यावर मारहाणीचा खटला होता. न्यायालयाच्या आदेशाने आणि जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या मदतीवर कुक्कुटपालन व्यवसाय सुरु केला. सुरुवातीला १०० कोंबड्या होत्या. त्या वाढवून ६०० केल्या, कुडाळ, परोळा, मालवण या ठिकाणी बाजारात कोंबड्या विकून नफा कमवत असल्याचे त्यांनी सांगितले.
भर समुद्रात मच्छीमारांच्या नौकेला आग; जीव वाचवण्यासाठी खलाशांची थेट समुद्रात उडी, पाहा थरारक व्हिडिओ
जिल्हा परिविक्षा अधिकारी बी.जी. काटकर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,अपराधी परिविक्षा अधिनियम १९५८ (अधिनियम क्र.२०) नुसार न्यायालयामध्ये खटले दाखल असतात. न्यायालयाकडून अशा आरोपींना सुधारण्याची संधी दिली जाते. जिल्हा परिविक्षा अधिकारी यांच्या देखरेखीखाली सोडण्यात येते. परिविक्षा अधिकारी गृहभेट करुन त्या व्यक्तींचा अहवाल न्यायालयात देत असतो. त्याची पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने रोजगारासाठी २५ हजार अर्थसहाय दिले जाते. सुरुवातीला हे अनुदान २० हजार होते. १४ ऑक्टोबर २०१६ मध्ये शासन निर्णय निर्गमित करुन यात पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.
नारळ काढताना घात झाला, झाडावरुन कोसळून ग्रामस्थाचा मृत्यू, पत्नीचा टाहो
चुकून झालेल्या अपराधासाठी पुन्हा नव्याने पुनर्वसनाची संधी देत महाराष्ट्र शासनाने कुटुंब उभे करण्याची योजना महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून पुढे आणली आहे. यातून अपराध्यांना गुन्ह्यापासून परावृत्त करून समाजात सामान्य जीवन जगण्यासाठी संधी मिळत आहे. यामधून मानवतेची शिकवण देत ही योजना अपराध्यांना यशस्वी उद्योजक बनवत नवी ओळख पुढे आणत आहे.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here