काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत काही लोक पुरात अडकलेल्या एका गेंड्यांच्या पिल्लाची सुटका करत आहेत. या भयानक पुरात या गेंड्याच्या पिल्लाची आपल्या आईपासून ताटातूट झाली आहे. सीडब्ल्यूआरसीचे पथक आणि काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचे कर्मचारी या गेंड्याच्या पिल्लाच्या आईचा शोध घेत आहेत.
या गेंड्याची पिल्लाची सुटका करत सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. या पिल्लाला काझीरंगामधील पुनर्वसन केंद्रात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या केंद्रात या गेंड्याच्या पिल्लाची उत्तम प्रकारे काळजी घेण्यात येत असून त्याला आवश्यक ते अन्नही पुरवले जात आहे. या बाबत एएनआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार या गेंड्याच्या पिल्लाला कशा प्रकारे दूध पाजण्यात येत आहे हे खालील व्हिडिओत दिसत आहे.
वाचा:
पुरात अनेक जंगली जनावरे वाहून गेली
काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि टायगर रिझर्व्हने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आपल्या आईपासून विलग झालेल्या या गेंड्याच्या पिल्लाला त्याचा जीव वाचवून एका नावेद्वारे सुरक्षित ठिकाणी नेले जात असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.
या गेंड्याच्या पिल्लाच्या आईला शोधण्याचे काम अत्यंत कठीण असून पुरामुळे येथील स्थिती अतिशय बिकट झाली आहे.
वाचा:
आसाममधील ब्रह्मपुत्र आणि इतर नद्यांचे पाणी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात शिरले आहे. या पुराच्या पाण्यात अनेक प्राणी वाहून गेली आहेत. येथील अधिकाधिक जनावरांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. पुराच्या पाण्यामुळे पुरात अडकलेल्या प्राणांची सुटका करणे हे काम देखील अत्यंत कठीण होऊन बसली आहे. या पुरामुळे तर असंख्य लोकांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांती पिकेही या पुराच्या पाण्यात वाहून गेलेली आहेत.
पाहा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times