Aurangabad News: यावर्षी चांगला पाऊस झाल्याने नदी, नाले तुडुंब भरली आहेत. त्यामुळे यंदा माशांचे (Fish) प्रमाण देखील वाढलेले आहेत. त्यामुळे मच्छीमार (Fisherman) सद्या पहाटेच जाळे लावून मासे पकडत आहे. दरम्यान औरंगाबादच्या एका मच्छीमारासोबत वेगळाच प्रकार घडला आहे. या मच्छीमाराच्या जाळ्यात चक्क साप (Snakes) अडकले. विशेष म्हणजे एक-दोन नव्हे तर तब्बल 20 साप अडकल्याने मच्छीमाराची भंबेरीच उडाली. त्यामुळे अखेर सर्पमित्र्याच्या मदतीने या सापांची सुटका करण्यात आली.

नदी किंवा तलावात मासे पकडण्यासाठी टाकलेल्या जाळ्यात बऱ्याचदा कचरा अडकल्याच्या घटना घडतात. पण औरंगाबादच्या एका मच्छीमाराच्या जाळ्यात साप अडकले.  मंगळवारी विटावा शिवारातील तलावात ही घटना घडली. नेहमीप्रमाणे परिसरातील मच्छीमारांनी तलावात जाळे टाकले होते. मात्र जेव्हा पुन्हा तलावात येऊन जाळे बाहेर काढले तर या मच्छीमारांना धक्काच बसला. कारण जाळ्यात मासे नव्हे तर साप अडकले होते. विशेष म्हणजे एक दोन नव्हे तर चक्क 20 साप एकाचवेळी जाळ्यात अडकले होते.  त्यामुळे एवढे मोठे साप पाहून मासेमारी करणाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर सर्पमित्रांना बोलावून घेण्यात आले. परंतु यातील 20 पैकी 6 सापांचा मृत्यू झाला होता, तर 14 सापांचा जीव वाचविण्यात यश आले आहे. 

अखेर सापांची सुटका

विटावा गावच्या तलावात मासेमारी करणाऱ्या लोकांनी सोमवारी जाळे टाकले होते. जेव्हा मंगळवारी जाळे बाहेर काढल्यास त्यात साप आढळून आले. त्यामुळे जिवंत सापांना सुखरूप सर्पमित्रांच्या मदतीने निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले. यावेळी मानद वन्यजीव रक्षक डॉ. किशोर पाठक यांनी सर्पमित्र मनोज गायकवाड, लक्ष्मण गायके यांना घटनास्थळी पाठविले आणि सापांची सुटका केली.

live reels News Reels

काळजी घेण्याचे आवाहन… 

अनेकदा मच्छीमार पहाटेच जाळे लावण्यासाठी जातात. त्यामुळे अशावेळी याठिकाणी साप असण्याची दाट शक्यता असते. सोबतच जाळ्यात देखील साप अडकून येतात. त्यामुळे अशावेळी मच्छीमार यांनी काळजी घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केला आहे. विशेष म्हणजे अनेकदा महिला देखील मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरतात, त्यामुळे त्यांनी देखील काळजी घेण्याची गरज असल्याचे सर्पमित्र म्हणाले. 

थंडीत माशांची मागणी वाढली…

सद्या थंडीचे वातावरण असल्याने माशांची मागणी वाढली आहे. विशेष म्हणजे हॉटेल आणि ढाब्यावर देखील माशांची मागणी अधिक आहे. गरम समजले जाणारे मासे हिवाळ्यात खाण्यासाठी अनेकजण प्राधान्य देतात. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यात माशांची मागणी वाढली आहे. ज्यात जायकवाडी धरणातून रोज मोठ्याप्रमाणावर मासेमारी होतांना पाहायला मिळते. एवढंच नाही तर जायकवाडी धरणातील गोड पाण्यातील माशांची विशेष मागणी असून, औरंगाबादसह इतर जिल्ह्यात देखील हा मासा विक्रीसाठी जात असतो.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here