Cotton Price : सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton farmers) संकटात सापडला आहे. कारण सातत्यानं कापसाच्या दरात घसरण होत आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात सीसीआयकडून (The Cotton Corporation Of India Limited) कापसाची खरेदी सुरु आहे. मात्र, सातत्यानं कापसाच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत. कापसाच्या दरात जवळपास दीड ते दोन हजार रुपयांची घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या दरात घसरण

शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. विदर्भासह (Vidarbha) आणि मराठवाडा (Marathwada) आणि उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन (cotton Production) घेतले जाते. मात्र, सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. मागील वर्षी कापसाला मिळालेला विक्रमी दर पाहता यावर्षीही कापसाला चांगला दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, गेल्या आठवड्याभरात कापसाचे दर पंधराशे ते दोन हजार रुपयांनी घटले आहेत. त्यामुळं कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अचानक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सरकी आणि कापसाचा उठाव कमी झाल्यानं दर पडल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

सरकारनं कापूस दरासंदर्भात हस्तक्षेप करावा, शेतकऱ्यांची मागणी

नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात जवळपास लाखो क्विंटल कापूस शेतकऱ्यांनी साठवून ठेवला आहे. शेतकऱ्यांना कापसाचे दर वाढण्याची अपेक्षा आहे. सरकारनं कापूस दरासंदर्भात हस्तक्षेप करून कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Heavy Rain : आधीच अतिवृष्टीचा तडाखा, त्यात आता दरांमध्ये घसरण

यावर्षी राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली होती. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पीक या अतिवृष्टीनं वाया गेली होती. वाया गेलेल्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, फळबागा, भाजीपाला या पिकांचा समावेश होता. यामध्ये सर्वात मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. काही ठिकाणी तर पिकांबरोबर जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. अशा अतिवृष्टीच्या तडाख्यातूनही काही शेतकऱ्यांची पीक वाचली होती. ती पीक आता बाजारात विक्रीसाठी येत आहेत. मात्र, सध्या शेतीमालाला योग्य प्रकारचा दर मिळत नसल्यानं शेतकरी सकटात सापडला आहे.

live reels News Reels

महत्त्वाच्या बातम्या:

Cotton Price : शेतकऱ्यांची चिंता वाढली, 10 दिवसात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here