Maharashtra Assembly Winter Session : “राजीनामा द्या, राजीनामा द्या.. भ्रष्ट मंत्री राजीनामा द्या”, “विदर्भ हैराण, सत्ताधारी खातो गायरान”, “खाऊन खाऊन पन्नास खोके.. माजले बोके, माजले बोके” अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) आमदारांनी सत्ताधाऱ्यांविरोधात (Eknath Shinde Devendra Fadnavis government) जोरदार निदर्शनं केली. काल संत्री तर आज खाली खोके हातात घेऊन विरोधकांनी “हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. खोकेवाल्यांची हकालपट्टी करा..” म्हणत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. आमदारांनी हातात टेलीबर्डचे बोके आणि रिकामे खोके हातात घेऊन सरकारचा निषेध केला.

विरोधकांच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणाणला

विधिमंडळ अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Winter Session) दुसऱ्या आठवड्यातील चौथ्या दिवसाचं कामकाज सुरु झालं आहे. आजही विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक सूर आळवला. “हकालपट्टी करा, हकालपट्टी करा.. भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करा”, “शेतकऱ्यांना धोका, मंत्र्यांना खोका”, “विदर्भाला धोका, मंत्र्यांना खोका”, “महाराष्ट्राला धोका… मंत्र्यांना खोका”, “शेतकरी हैराण, सरकार खातो गायरान”, “सीमावासी हैराण.. सरकार खातो गायरान” या घोषणांनी विरोधकांनी विधानभवन परिसर दणाणून सोडला. 

या आंदोलनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar), विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve), नाना पटोले (Nana Patole), रोहित पवार (Rohit Pawar), यशोमती ठाकूर (Yashomati Thakur), धनंजय मुंडे (Dhananjay Munde), जितेंद्र आव्हाड भास्कर जाधव, सचिन अहीर, विकास ठाकरे यांच्यासह सर्व विरोधी पक्षाचे आमदार सहभागी झाले होते.

महाराष्ट्रासाठी खोके नवीन नाही. गाव, वाडे, तांडे इथपर्यंत खोके पोहोचले आहेत. बैलपोळ्यामध्ये बैलांच्या झोळीवर देखील खोके होते. सभागृहातील या बोक्यांनी खोके खाल्ले आणि माजले देखील. हे आम्ही खोके आणि बोके घेऊन प्रतिकात्मक आंदोलन केले असल्याचे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

live reels News Reels

सत्ताधारी आमदार शांत

नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीचे आमदार पायऱ्यांवर येताच सत्ताधारी आमदारही आपल्या पक्ष कार्यालयातून महाविकास आघाडी विरोधात घोषणा देत माध्यमांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सत्ताधारी आमदार शांत असल्याचे दिसून येत आहे.

ही बातमी देखील वाचा…

काही दिवसांनी मुख्यमंत्री काळी टोपी, खाकी पॅन्ट घालून सभागृहात येतील, एकनाथ शिंदेंच्या रेशीमबाग भेटीवरून संजय राऊतांचं टीकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here