औरंगाबादः करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी राज्यात लॉकडाऊननंतर मिशन बिगिन अगेन अंतर्गंत अनेक व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. असं असलं तरी मात्र, अद्याप जिम, उद्यानं आणि मंदिरे नागरिकांसाठी बंदच ठेवण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आणि खासदार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलं आहे. श्रावण महिना सुरू झाला आहे, त्यामुळं मंदिरं खुली करा, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ( writes letter to )

‘हिंदू बांधवांचा श्रावण महिना सुरु झाला आहे. या महिन्यात फक्त भाविकांसाठी मंदिरे उघडली जावी. मंदिरे बंद असल्यानं धार्मिक कार्य करण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. श्रावण महिन्यात लोक भक्ती भावानं साजरा करतात. मंदिरं उघडल्यास भाविक सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून धार्मिक कार्य करतील,’ असं ते म्हणाले आहेत.

वाचाः

‘मंदिरे बंद असल्यानं पूजेसाठी व विधीसाठी जे सामान विक्री होते त्यांच्या व्यवसायही ठप्प झाला आहे. त्यामुळं औरंगाबाद जिल्ह्यातील मंदिरे सुरक्षित वावरांच्या नियम पाळूनच भक्तांसाठी खुली करण्यात यावी.’ अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गेल्या चार महिन्यांपासून मंदिरे बंद आहे. यंदाच्या महत्त्वाच्या सणांवरही करोनाचे सावट पसरले आहे. हजारो वर्षांची परंपरा असलेली आषाढी वारीही यंदा करोनामुळं रद्द करण्यात आली होती. तसंच, गणेशोत्सवातील मिरवणूकाही न काढण्याचं आवाहन सरकारनं केलं आहे. त्याचबरोबर, विसर्जनसुद्धा घरीच करण्याचे आदेश सरकारनं दिला आहे. दही हंडी उत्सवालाही यंदा करोनामुळं गालबोट लागलं आहे.

वाचाः

औरंगाबाद जिल्ह्यात करोनाचे थैमान

औरंगाबाद जिल्ह्यात आत्तापर्यंत ४११ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर, आत्तापर्यंत ११ हजार ७६९ करोनारुग्ण सापडले आहेत. तर, ६ हजार ४९७ करोनामुक्त झाले असून ४ हजार ८६१ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here