चंद्रपूर: संपत्तीच्या वादातून पुतण्याने चुलत्याची हत्या केली. लाकडी टेबलाच्या दांड्याने डोक्यावर प्रहार केला आणि स्वतःच उपचारासाठी त्यांना रुग्णालयात घेऊन गेला. काका खाली पडल्याने त्यांना जखम झाल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितले. मात्र जखम बघून डॉक्टरांना संशय आला. त्यातून पुढे हत्या प्रकरण उघडकीस आले. प्रभाकर धर्माजी नागोसे असे मृत चुलत्याचे नाव आहे. त्यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी रुपेश पत्रु नागोसे याला अटक केली आहे.

मृत प्रभाकर नागासे यांच्या वडिलांनी सहा मुलांमध्ये शेतीचे हिस्से केले. त्यापैकी एक हिस्सा स्वतः कडे ठेवला. प्रभाकर यांनी आई-वडिलांचा मरेपर्यंत सांभाळ केल्यामुळे वडील मरण पावल्यानंतर त्यांचा हिस्सा स्वतः ठेऊन घेतला होता. प्रभाकर यांनी प्लॉट विक्रीचा व्यवसाय करुन दोन वर्षांपूर्वी नवीन घर बांधले.मु लबाळ नसूनही प्रभाकर धनसंपत्ती जमा करत असल्याने बुट्टिबोरी येथे काम करीत असलेला आरोपी रुपेशचा चुलत्यावर राग होता.
औरंगाबादेत भावंडांना भरबाजारात बेशुद्ध होईपर्यंत मारहाण; कारण वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात
चुलत्याचा वचपा काढण्यासाठी रुपेश बुट्टीबोरी येथून मंगळवारी चिमूरला आला. मात्र त्यावेळेस चुलता घरी नव्हता. रुपेशचा चुलती सोबत वाद झाला. त्यावेळी त्याला चुलता प्रभाकर घराकडे येताना दिसता. रुपेशने घरात शिरुन लाकडी स्टूल फरशीवर आपटून तोडला. चुलता घरी येण्यापूर्वीच त्याला रस्त्यात गाठून रुपेशने स्टूलच्या दांड्याने प्रभाकर यांच्या डोक्यावर वार केले.

डोक्याला जबर मार लागल्याने प्रभाकर रक्ताच्या थारोळ्यात पडले. हा खून लपवण्यासाठी राकेशने प्रभाकर यांच्या पत्नीला ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर प्रभाकर यांना उपचारांसाठी दवाखान्यात घेऊन गेला. गंभीर जखमी असल्याने डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र रुपेशने प्रभाकर यांना रुग्णालयात घेऊन न जाता घरी गाठले.
Sorry Papa! आता काहीच शिल्लक राहिलं नाही, मी जातोय! विद्यार्थ्यानं टोकाचा निर्णय घेतला
अतिरक्तस्त्राव आणि जखमा झाल्याने प्रभाकर यांची प्रकृती बिघडली. त्यांना पहाटे पाचच्या सुमारास उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली. मृतकाची पत्नी भीतीपोटी कधी पती पडून जखमी झाला तर कधी मारल्याचे सांगत होती. मात्र प्रभाकर यांच्या जखमा पाहून त्यांची हत्याच झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. प्रभाकर यांची मेहुणी रेखा दामोदर आदमने रुपेशविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी रुपेशला ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अलीम शेख करत आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here