औरंगाबाद : पाच वर्षीय मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचताना धक्का लागल्याने नातेवाईकांमधीलच दोन गटांमध्ये वाद झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भांडणात चक्क तलवारी आणि सुरे घेऊन ते एकमेकांना भिडले. या भांडणात एका ३५ वर्षीय युवकाची भोसकून हत्या करण्यात आली आहे. तर इतर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यातील एकाची प्राकृती चिंताजानक आहे. ही घटना बुधवारी मध्यरात्री जीन्सी भगातील किराडपुरा येथील बदामगल्लीत घडली.

या धक्कादायक घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सय्यद माजिद सय्यद पाशा (वय ३५, रा. गल्ली क्र. ६, किराडपुरा) असे हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. मजर पठाण, मुज्जू पठाण, अरबाज पठाण, जाकेर पठाण, सलमा पठाण (सर्व रा. गल्ली क्र. ६ मक्कामस्जिद जवळ किराडपुरा औरंगाबाद) अशी हत्या करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.

माहिती कसली घेताय, प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंनाच सुनावले; उपसभापतींची समज

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणी मृत सय्यद हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. बुधवारी रात्री कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकल्याचा वाढदिवस होता. त्यासाठी सर्व नातेवाईक कार्यक्रमाला आले होते. वाढदिवस झाल्यावर नाचण्याचा कार्यक्रम सुरु होता. नाचताना सय्यदचा धक्का आरोपींना लागला. यावरून मोठा वाद झाला. मात्र, त्यानंतर उपस्थित नातेवाईकांनी मध्यस्थी करून भांडण सोडवलं. मात्र, काही वेळाने आरोपींनी तलवार, चाकू घेऊन सय्यद व त्याच्या कुटुंबावर हल्ला केला.

दोन्ही गटांमध्ये तुफान राडा झाला. या वादत माजिद, सय्यद जावेद, सय्यद वाजेद, सय्यद अजीज हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले. जखमींची अवस्था पाहून आरोपी घटनस्थळावरून फरार झाले. उपस्थित नातेवाईकांनी पोलिसांना पचारण करत जखमींना रुग्णालयात हलवले. मात्र, सय्यद माजिदला तपासून डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इतर तिघांवर उपचार सुरु असून एकाची परिस्थिती चिंताजनक आहे. या प्रकरणी जीन्सी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यता घेतले आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शिंदेंच्या मनात संघ विचारांचा रेशीम कीडा पूर्वीपासूनच वळवळतोय, उद्या सभागृहात खाकी पँट घालून येतील: संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here