मुंबईः करोना व्हायरसचं राज्यात थैमान सुरूच आज राज्यात तब्बल साडे दहा हजार रुग्णांची उच्चांकी वाढ झाली आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वाधिक आकडा असल्यानं प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. राज्यात करोना मृत्यूंचा आकडाही भीतीदायक आहे. आज दिवसभरात २८० जणांचा मृत्यू झाल्यानं एकूण करोना मृतांची संख्या १२ हजार ५५६वर पोहोचली आहे. अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. ()

राज्यातील करोनाची स्थिती चिंता वाढवणारी आहे. राज्यात आज १० हजार ५६७ रुग्णांची नोंद झाली आहे. रुग्णांचा वाढता आलेख काळजी वाढवणारा आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या ३ लाख ३६ हजार ६०७ इतकी झाली आहे. आज २८० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्यानं सध्या राज्यातील मृत्यू दर ३. ७२ टक्के इतका आहे. विविध रुग्णालयात सध्या १ लाख ३६ हजार ९८० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

समाधानकारक बाब म्हणजे, आज तब्बल ५ हजार ५५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आत्तापर्यंत एकूण १ लाख ८७ हजार ७६९ जणांनी करोनावर यशस्वी मात केली असून राज्याचा रिकव्हरी रेट ५५. ६२ टक्के इतका आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १६ लाख ८७ हजार २१३ चाचण्यांपैकी ३ लाख ३६ हजार ६०७ (२० टक्के) जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या राज्यात ८ लाख ५८ हजार १२१ व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहेत तर, ४४ हजार ९७५ जणं संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

वाचाः

पुण्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण

मुंबईपेक्षा इतर शहरांतील संसर्ग वाढताना दिसत आहे. आज सर्वाधिक रुग्णवाढ पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्याखालोखाल ठाण्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात नोंद झालेले २८० मृत्यू हे मुंबई मनपा-५८, ठाणे-१६, ठाणे मनपा-१३, नवी मुंबई मनपा-३,कल्याण-डोंबिवली मनपा-६, उल्हासनगर मनपा-२, भिवंडी निजामपूर मनपा-३, मीरा-भाईंदर-७, वसई-विरार मनपा-४,पालघर-१,रायगड-१,पनवेल-३, नाशिक-२, नाशिक मनपा-४, अहमदनगर-३, अहमदनगर मनपा-३, धुळे-१, जळगाव-८, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-३, पुणे मनपा-३६, पिंपरी-चिंचवड मनपा-१८,सोलापूर-६, सोलापूर मनपा-६, सातारा-२, कोल्हापूर-६, कोल्हापूर मनपा-१०, सांगली-१, सांगली मिरज कुपवाड मनपा-३, रत्नागिरी-३, औरंगाबाद-४, औरंगाबाद मनपा-२३, जालना-१, हिंगोली-१, परभणी-२, लातूर-२, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, नांदेड मनपा-३, अकोला-१, अकोला मनपा-२, बुलढाणा-१, नागपूर मनपा-३, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here