अनिलची पत्नी पूनमनं प्रियकर राहुलच्या मदतीनं हत्या केली. राहुल अनेकदा अनिलच्या घरी यायचा. अनिलच्या कुटुंबीयांनी अनेकदा याबद्दल आक्षेप नोंदवला. शेजारच्यांना याची कल्पना होती. यावरून कुटुंबात अनेकदा वाद झाले. राहुल माझा भाचा आहे. मी त्याला मुलगा मानते, असं पूनम सांगायची. अनिलला पूनम आणि राहुलवर संशय होता. त्यामुळे पूनम आणि राहुलनं अनिलचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.
सोमवारी रात्री राहुल आणि पूनम यांनी अनिलची हत्या केली. हृदयविकाराच्या झटक्यानं अनिलचा मृत्यू झाल्याचं पूनमनं सगळ्यांना सांगितलं. तिनं रडण्याचं नाटक केलं. मंगळवारी सकाळी गुपचूपपणे अनिलवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याची माहिती मिळताच पोलीस गावात पोहोचले. त्यानंतर प्रेमी युगुलाला अटक करण्यात आली. दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.
अनिल कुमार मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा. त्याचा विवाह १० वर्षांपूर्वी हापुडमधील पूनमसोबत झाला. दोघांना सहा वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. अम्हैडा गंगानगरमध्ये वास्तव्यास असलेला राहुल दोन महिन्यांपूर्वी अनिलच्या घरी राहायला आला. राहुल आपला मानलेला भाऊ असल्याचं पूनम सांगायची. मात्र तिचे राहुलसोबत अवैध संबंध होते. त्यांच्याबद्दल अनिलला संशय होता. त्यानं विरोधही दर्शवला. त्यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले.