बंगळुरू: एका निनावी पत्रामुळे नऊ महिन्यांपूर्वी घडलेल्या हत्येचं गूढ उकललं आहे. मार्चमध्ये एका तरुणाची हत्या झाली. एका निनावी पत्रामुळे हा खून उजेडात आला. पोलिसांनी या पत्रातील माहितीवरून तपास सुरू केला. अखेर या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली.

कोनानाकुंटे येथील हरीनगरात वास्तव्यास असलेल्या २७ वर्षांच्या शरथ कुमारची हत्या झाली. त्यानं तीन जणांची फसवणूक केली होती. शरथ रोजंदारीवर काम करायचा. मार्चमध्ये त्यानं नोकरीच्या शोधात घर सोडलं. २९ मार्चला त्याचं अपहरण झालं. त्यानंतर आरोपींनी त्याची हत्या केली. शरथची हत्या आरोपींनी पचवली होती. मात्र नोव्हेंबरमध्ये कुब्बोन पार्क परिमंडळाचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र डी. एस. यांना एक निनावी पत्र आलं. शरथ कुमार एकाएकी बेपत्ता झाला. त्याचा खून झाला, असा उल्लेख पत्रात होता. याच पत्रात आरोपीबद्दल काही संकेत देण्यात आले होते.
मम्मीने पाय पकडले, अंकलने पप्पांचा गळा दाबला; निष्पाप मुलांनी सारंच सांगितलं; पोलीस सुन्न
पत्र हाती लागताच पोलिसांनी प्रथम शरथच्या पालकांचा शोध घेतला. कित्येत महिन्यांपासून शरथ आपल्या संपर्कात नसल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर पोलिसांनी विशेष पथक तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. व्यंकटचलापती आणि त्याचा मुलगा शरत कुमार यांना पोलिसांनी चिक्कबल्लारपूरमधून अटक केली. त्यांचे साथीदार धनुष, संकेथ आणि मंजुनाथ यांनादेखील बेड्या ठोकण्यात आल्या.

व्यंकटचलापती आणि त्याच्या टोळीनं २१ मार्चला शरथचं अपहरण केलं. व्यंकटचलापतीच्या चिकबल्लारपूर येथील फार्महाऊसवरील एका खोलीत त्याला डांबून ठेवण्यात आलं. तिथे शरथला प्रचंड त्रास देण्यात आला. त्यामुळे शरथचा मृत्यू झाला. यानंतर त्याचा मृतदेह गोणीत भरण्यात आला. एका कारमध्ये मृतदेह टाकून तो चारमाडी घाटात फेकण्यात आला.
बेबी-अंजली-अफसाना-दिव्याचा भयंकर शेवट; दोनदा धर्मांतर, तीन विवाह; व्हिडीओ कॉलमुळे जीव गेला
चारचाकीसाठी विनाव्याज कर्ज देतो असं सांगून शरथनं दहापेक्षा अधिक जणांना जवळपास २० लाखांना फसवलं होतं. त्यातील काही जणांनी व्यंकटचलापतीकडे धाव घेतली. तुमचे पैसे परत मिळवून देऊ असा शब्द व्यंकटचलापतीनं त्यांना दिला. त्यानंतर आरोपीनं पैसे वसूल करण्यासाठी शरथचं अपहरण केलं. मात्र त्याचा मृत्यू झाला.

मी नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात जात आहे. मला शोधण्याचा किंवा माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू नका, अशा आशयाचा मेसेज शरथनं आई वडिलांना केला होता. तोच त्याचा अखेरचा मेसेज ठरला. तेव्हापासून त्याचा स्विच्ड ऑफ होता. शरथ कधीतरी परतेल या आशेनं त्याच्या आई वडिलांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली नाही. पोलिसांना अद्या शरथच्या मृतदेहाचे अवशेष सापडलेले नाहीत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here