Nandurbar Agriculture News : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पीक (Rabi Season Crop) धोक्यात आली आहेत. कारण विद्युत वितरण कंपनीकडून ट्रान्सफॉर्मर (Electrical Transformers) लवकर मिळत नसल्याने शेतकरी (Farmers) अडचणीत आले आहेत. एकीकडं राज्य सरकारनं शेतकऱ्यांकडून वीज बिल वसूली करू नये, असा आदेश दिला आहे. मात्र, दुसरीकडे खराब झालेले ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यासाठी शेतकऱ्यांकडे वीज बिल भरण्याची अट घातली जात आहे.

रब्बी हंगामातील पीक धोक्यात

नंदूरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक शेतकऱ्यांचे ट्रान्सफॉर्मर खराब झाले आहेत. खराब झालेले ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यासाठी शेतकऱ्यांकडे वीज बिल भरण्याची अट घातली जात आहे. एकीकडे रब्बी हंगामाच्या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता असताना ट्रान्सफॉर्मर बदलवण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत असल्याचे दिसत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत शेती पंपांची वीज जोडणी कट करू नये किंवा शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करू नये असे आदेश दिले आहे. अशातच आता विद्युत वितरण कंपनीच्या  वसुलीचा नवीन फंडा समोर आला आहे. खराब झालेला ट्रान्सफॉर्मर बदलून देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी वीज बिल भरण्याची अट घालण्यात आली आहे. शेतकऱ्यांना नवीन ट्रान्सफॉर्मर लवकर दिला जात नाही. ट्रान्सफॉर्मर बदलून मिळण्यासाठी वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांची रब्बी हंगामातील पीक धोक्यात आली आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही हीच परिस्थिती

दरम्यान, ही परिस्थिती केवळ एकट्या नंदूरबार जिल्ह्याची नसून, उत्तर महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यातही हीच परिस्थिती असल्याचे समोर आलं आहे. शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना आणि तोडणीवर आलेल्या ऊसाला पाणी देणं महत्वाचे आहे. त्यामुळे शेतकरी ट्रान्सफॉर्मर लवकर मिळावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसरीकडं सरकार शेतकऱ्यांना एका हाताने देत आहे तर दुसऱ्या हाताने काढून घेत असल्याचे चित्र आहे. त्यामुळं शेतकरी  हवालदिल झाला आहे. ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळं अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला संकटात गाठून त्यांच्याकडून वीज बिल वसूल करण्याचा नवीन मार्ग सापडल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

रब्बी हंगाम वाया जाण्याची शक्यता

यावर्षी राज्यातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका शेतखऱ्यांच्या पिकांना बसला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठ आर्थिक नुकसान झालं आहे. खरीपाची बऱ्यापैकी पीक अतिवृष्टीमुळं वाया गेली आहेत. अशातच शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा या रब्बी हंगामाकडे लागल्या होत्या. मात्र, आता रब्बी हंगाम देखील वाया जाण्याची शक्याता निर्माण झाली आहे.

live reels News Reels

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here