Nashik News : भारत निवडणूक आयोगाने (Election commission) नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ (Graduate Constituency Election) द्विवार्षिक निवडणूक 2022 चा कार्यक्रम जाहीर केला असून सदर कार्यक्रमानुसार नाशिक (Nashik) विभागात आदर्श आचारसंहिता (code of conduct) लागू झाली असल्याची माहिती उपायुक्त (सामान्य प्रशासन) उन्मेष महाजन यांनी दिली आहे.

निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्या नंतर विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याची माहिती उपायुक्त उमेश महाजन यांनी दिली. जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार पाच जानेवारीला अधिसूचना काढली जाईल. 12 जानेवारी पर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. 13 जानेवारीला अर्जाची छाननी होईल माघारी साठी 16 जानेवारी अंतिम मुदत आहे. 30 जानेवारी रोजी सकाळी आठ ते दुपारी चार या कालावधीत मतदान प्रक्रिया राबवण्यात येणार आहे तर 2 फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. तर नाशिक विभागीय पदवीधर मतदार संघात विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे आहेत. त्यांचा कार्यकाळ 7 फेब्रुवारीला संपणार आहे. 

दरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर मतदार नोंदणीसाठी वेग येणार आहे. ऑनलाइन नोंदणीला सात नोंव्हेबर 
पासून सुरुवात झाली असली तरी आतापर्यंत राज्यात नाशिक विभाग मतदार नोंदणी सर्वाधिक आघाडीवर आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने मतदार नोंदणी प्राप्त होण्याची शक्यता आहे. सध्या कोणताही उमेदवार आपले पत्ते उघड करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी करत नसल्याचे दिसून येत आहे. 

असा आहे निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना जारी करणे (5 जानेवारी 2023 गुरुवार)
नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक (12 जानेवारी 2023 गुरुवार)
नामनिर्देशन पत्राची छाननी (13 जानेवारी 2023 शुक्रवार)
उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक (16 जानेवारी 2023 सोमवार)
मतदानाचा दिवस (30 जानेवारी 2023 सोमवार)
मतदानाचा कालावधी (सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत)
मतमोजणी दिनांक (2 फेब्रुवारी 2023 गुरुवार)

live reels News Reels

हे आहेत नाशिक जिल्ह्यातील मतदान केंद्र
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, बागलाण, मालेगाव, नांदगाव, येवला, चांदवड, निफाड, दिंडोरी, पेठ, नाशिक, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सिन्नर या ठिकाणी केंद्र असून जवळपास 99 केंद्र आणि 66 हजार 709 मतदार आहेत.

कामांवर निर्बंध 
निवडणूक आयोगाने नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2022 चा कार्यक्रम जाहीर केल्यामुळे विभागात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महानगरपालिका सह जिल्हा नियोजन समिती मार्फत जनतेवर प्रभाव पडेल, असे निर्णय व नवीन कामे सुरू करण्यावर निर्बंध आले आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून चालू आर्थिक वर्षात अल्प निधी खर्च झाला आहे. मार्च अखेरपर्यंत निधी करण्यात खर्च करण्याचे आव्हान होते, मात्र आता आचारसंहिता लागू झाल्यामुळे समितीचे निधी खर्चाचे नियोजन अडचणीत आले आहे. आदर्श आचारसंहिता एक महिना अधिक काळ लागू राहणार असल्याने या काळात लोकांवर प्रभाव पडला असे कुठलेही नवीन काम सुरू करणे व निर्णय घेण्यास प्रतिबंध असतो. त्यामुळे नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार व नगर जिल्ह्यातील अनेक कामे खोळंबणार असल्याचे चित्र आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here