Aurangabad Police Patil Recruitment: औरंगाबाद जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरले जाणार असून, याबाबत जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय आदेश काढले आहेत. जिल्ह्यातील एकूण 384 पोलीस पाटलांचे रिक्त पदे भरण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी एक पत्र काढले आहेत. यासाठी 21 फेब्रुवारीपासून अर्ज मागवले जाणार आहे. तर 29 मार्चला यासाठी लेखी परीक्षा होणार आहे. तसेच 15 एप्रिलला अंतिम उमेदवाराची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 

औरंगाबाद जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, औरंगाबाद जिल्हयातील पोलीस पाटलांची 384 एवढी पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठया संख्येने पदे रिक्त असल्या कारणाने गावामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास कार्यकारी दंडाधिकारी व पोलीस अधिकारी यांना आवश्यक ती माहिती मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे अशी अडचण निर्माण होऊन गावातील अपराधाचे प्रमाण वाढु नये, गावातील नागरिकांचे सामाजिक स्वास्थ व शांतता अबाधित राहिल, नैसर्गिक आपत्ती सारख्या अडचणीमध्ये योग्य ती उपाययोजना तातडीने करता येण्यास मदत होईल, यादृष्टीकोनातून पोलीस पाटीलांची सदर रिक्त पदे तातडीने भरणे आवश्यक आहे. या करीता जिल्हयामध्ये एकसूत्रीपणा असावा या दृष्टीकोनातून पोलीस पाटील भरतीचे वेळापत्रक ठरवून देणे योग्य वाटत असल्याने महाराष्ट्र ग्रामपोलीस अधिनियम 1967 चे कलम 3 नुसार प्राप्त अधिकारानुसार पोलीस पाटील भरतीचे निर्देश देत असल्याचं जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. 

पोलीस पाटील भरती वेळापत्रक 











अ.क्र. भरती प्रकियेचे टप्पे  कार्यवाहीचा कालावधी 
1 उपविभागीय अधिकारी यांनी रिक्त पदांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करणे  5 जानेवारी 2023 पर्यंत 
2 बिंदू नामावली तयार करणे व ती मंजूर करून घेणे  06 जानेवारी ते 20 जानेवारी 2023 पर्यंत 
3 गावनिहाय आरक्षण निश्चित करणे  21 जानेवारी ते 05 फेब्रुवारी 2023 पर्यंत 
जाहिरात प्रसिद्ध करणे  06 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत 
5 अर्ज मागविणे  21 फेब्रुवारी ते 08 मार्च 2023 पर्यंत 
6 अर्जाची छाननी करणे व अर्जदार यांना प्रवेशपत्र पाठविणे  09 मार्च ते 23 मार्च 2023 पर्यंत 
7 लेखी परीक्षा घेणे   29 मार्च रोजी 
78 पत्र उमेदवारांची तोंडी परीक्षा (मुलाखती) घेणे व अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे  15 एप्रिल रोजी 
9 पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्र देणे  26 एप्रिल रोजी 

पोलीस पाटलांचे कर्तव्य…

live reels News Reels

गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्वाची जबाबदारी पोलीस पाटील यांच्यावर असते. गावपातळीवर तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गुन्ह्याची माहिती पोलीस ठाण्यास देण्याचे काम पोलीस पाटील करतात. नैसर्गिक आपत्ती, रोगराई अशा गोष्टींचा अहवाल वरिष्ठांना देण्याचे काम देखील त्यांच्याकडे असते. कार्यक्षेत्रातील गावातील अनैसर्गिक किंवा संशयास्पद मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना देण्याचे काम पाटील करतात. यासोबतच सण, उत्सव, यात्रा, राजकारण, निवडणुका दरम्यान गावातील घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवत याबाबत वेळोवेळी पोलिसांना माहिती देण्याचे काम देखील पोलीस पाटील करतात. त्यामुळे ग्रामीण भागात पोलीस पाटालांवर मोठी जबाबदारी असते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here