पुणेः रुग्णालयात बेड उपलब्ध होत नसल्यानं सहा ते सात तासं खोळंबा झालेल्या पुण्यातील त्या रुग्णाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ()

रुग्णालयात रुग्णाला प्रवेश का नाकारला? रुग्णालयात बेड उपलब्ध होते की नाही? याबाबत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिला आहे. व पीडित रुग्ण कोणकोणत्या रुग्णालयात गेला होता याचीही सविस्तर माहिती देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

धायरी येथे राहणाऱ्या मनोज कुंभार या ३४ वर्षीय तरुणाला सकाळी श्वास घेण्यास त्रास होऊ लागला होता. त्यामुळे या तरुणाच्या मित्रांनी तातडीने ऑक्सिजन ॲम्बुलन्स बोलावून त्यामधून मनोजला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. दुपारी दोन वाजल्यापासून शहरातील अनेक मोठ्या रुग्णालयात जाऊन त्यांनी या तरुणाला ऍडमिट करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रत्येकवेळी त्यांच्या पदरी निराशाच आली. आमच्याकडे सध्या ऑक्सीजन बेड उपलब्ध नाही तुम्ही रुग्णाला घेऊन दुसरीकडे जावा, असा सल्ला त्यांना हॉस्पिटल प्रशासनाकडून दिला जात होता.

तरुणाला बेड उपलब्ध न झाल्यानं तरुणाच्या नातेवाईकांनी अलका चौकात रुग्णवाहिका उभी करुन ठिय्या आंदोलन सुरू केलं. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला. अखेर पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढून घडलेला प्रकार महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळवण्यात आला. त्यावर पालिकेनं दळवी रुग्णालयात बेड उपलब्ध करुन दिला मात्र, त्याचा लढा अयशस्वी ठरला.

पुण्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण सापडले आहेत. आज तब्बल बाधीत रुग्ण ६३,३५१ बाधित रुग्ण सापडले आहेत. तर सध्या ३९ हजार ३५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर एकूण २२ हजार ४८४ रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. व १५१४ जण दगावले आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here