कर्नाल: क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला दिल्ली-देहरादून महामार्गावर पहाटे साडेपाचच्या सुमारास अपघात झाला. पंत दिल्लीहून त्याच्या उत्तराखंडमधील घरी जात असताना कारला भीषण अपघात झाला. अपघात झाल्यानंतर ऋषभ पंतची कार उलटली. पुढच्या काही क्षणांत कार सरळ झाली. तिनं पेट घेतला. सुदैवानं पंत बाहेर आल्यानं त्याचा जीव वाचला. यावेळी एका बसचे चालक आणि वाहक पंतसाठी देवदूत ठरले. दोघांनी वेळीच पंतला कारच्या बाहेर काढलं नसतं, तर मोठा अनर्थ घडला असता.

चालक सुशील कुमार बस चालवत असताना मी त्याच्या शेजारी बसलो होतो. बस नरसनजवळ पोहोचली. तेव्हा १००-१५० मीटर दूरवरून एक अनियंत्रित कार आमच्या बसच्या दिशेनं येत होती. ती कार आमच्या कार धडकण्याची भीती होती. कार रेलिंग तोडून दुसऱ्या बाजूला गेली, अशी माहिती हरयाणा रोडवेजच्या बसचे चालक परमजीत यांनी सांगितली. बसच्या समोर कार पलटली आणि बाजूनं गेली. कारचे काही पार्ट वेगळे झाले आणि बसला लागले. रेलिंग आपटून कार पुन्हा उभी राहिली. त्यानंतर पंतनं कारच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमी असल्यानं त्याला बाहेर पडता येत नव्हतं, असा घटनाक्रम परमजीत यांनी सांगितला.
VIDEO: धवनचं ऐकलं असतं तर पंतला हा दिवस पाहावा लागला नसता; गब्बरनं दिलेला मोलाचा सल्ला
थोड्या वेळानं कारनं पेट घेतला. आम्ही बसमधून उतरलो आणि कारच्या दिशेनं धाव घेतली. मी आणि बस चालकानं पंतला कारच्या बाहेर काढलं. त्याला दुभाजकावर झोपवलं. सुरुवातीला तो पंत असल्याचं आमच्या लक्षात आलं नव्हतं. त्यानं स्वत:चं आपली ओळख सांगितली. त्याचा चेहरा रक्तबंबाळ झाला होता. त्यामुळे आम्ही त्याला ओळखलं नाही, असं परमजीत म्हणाले.
पंतनं एकच चूक दोनदा केली, पण नशिबानं साथ दिली; पोलिसांच्या २ नोटिसा, तिसऱ्या वेळी अनर्थ घडला
कारमध्ये आणखी कोणी नाही ना, हे मी चालकाला तपासण्यास सांगितलं. मात्र कारमध्ये इतर कोणीही नसल्याचं स्वत: पंतनंच म्हटलं. त्यानंतर मी एका प्रवाशाकडून चादर आणली आणि ती पंतच्या अंगावर पांघरली. मी रुग्णवाहिकेला कॉल केला. १५ मिनिटांत रुग्णवाहिका आली. आम्ही पंतला रुग्णवाहिकेत ठेवलं, असं परमजीत यांनी सांगितलं.

1 COMMENT

  1. Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here