Maharashtra Assembly Winter Session: मागचं जे अधिवेशन झालं त्यातील अनेक दाखले देत आहात. मुख्यमंत्रीसाहेब तुम्हाला बहूमत मिळालं आहे. त्यातून तुम्ही बाहेर या, त्यात रमू नका. लोकांना हे आवडत नाही, लोकांना काम रोजगार पाहिजे, असा टोला अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. तुमच्या मुलांच्या वयाच्या नेत्यांवर तुम्ही टीका करता. मुलं आहेत म्हणून सोडून द्या ना… तुमच्या दुसऱ्या कार्यकर्त्यांना प्रवक्ते म्हणून बोलायला सांगा ना…  मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्यांनी राज्याचा विचार करावा.. तुमचे मोदी आणि शाह यांच्यासोबतचे चांगले संबंध झाले आहेत. त्यातून राज्याच्या भल्यासाठी काय नवीन आणता येईल, ते पाहा… असा टोला अजित पवारांनी एकनाथ शिंदे यांना लगावला. 

सहा महिन्यापूर्वी काय घडलं? हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. आज त्या घटनेला सहा महिने झाले आहेत. सभागृहामध्ये तीस वर्षांपासून आलोय. शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले होते. पण अधिवेशनात मुख्यमंत्र्यांची भाषणं कधीचं राजकीय नसतात.. एखादा दुसरा टोला लगावला तर मी समजू शकतो. पण सभागृहात मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाषण केलं. ज्यांना सोडून तुम्ही आलात, ते वृत्तपत्रामध्ये काही लिहिणार अन् तुम्ही मनाला लावून घेणार… अन् ते तुम्ही इथं सांगणार… ते आम्हाला काय घेणदेणं आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. यावेळी अजित पवार यांनी यशवंत चव्हाण यांचं उदाहरणही दिलं. ते म्हणाले की, यशवंत चव्हाण यांची शिकवण काय होती? आचर्य आत्रे त्यांच्यावर टीका करायचे पण ते प्रत्युत्तर देत नव्हते… ते दिलदारपणे घ्यायचे..   

अधिवेशनानंतर विरोधीपक्षानं पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी बोलताना अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. अजित पवारम म्हणाले की, ‘सीमा वादावर ठराव करताना अनेक गावाचा उल्लेख आम्ही करायला लावला. सुप्रीम कोर्टात पण आम्ही हरीश साळवे म्हणून वकील द्या ते पण मान्य केलं. आम्ही विक्रमी पुरवण्या मागण्या केल्या. महाविकास आघाडी सरकारने घेतलेला निर्णय बद्दल त्यांनी काही दखल घेतली काहीची नाही.. महापुरुषांचा अपमान होणार नाही याच्याबद्दल काहीही बोलले नाही. ज्यांनी अपमान केला त्या प्रश्नावर स्पर्श ही केला नाही. अजूनही मुख्यमंत्री त्या मधून बाहेर पडायला तयार नाहीत. ‘ 

live reels News Reels

‘आजच्या उत्तरामध्ये आमचं समाधान झालं नाही. धान उत्पादक प्रश्नी समाधान झालं नाही. आम्ही चार मंत्र्यांचे घोटाळे बद्दल पुरावे देखील दिले पण राजीनामा घेतला नाही. न्याय व्यवस्था असते त्यामुळे आम्ही तिथं न्याय मागू. एक वाय प्लसला 20 लाख खर्च येतो. यांना कशाला सुरक्षा पाहीजे, ज्यांना पाहिजे त्यांना द्या पण अनावश्यक सुरक्षा कशासाठी? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. ‘ आज जे विरोधी पक्षामध्ये आले आहेत त्यांची सुरक्षा काढली आहे..महाविकास आघाडीच सरकार असतांना कंगना, गिरीश महाजन, फडणवीस यांच्याबद्दल चर्चा होती. आम्ही कधीही  एका अधिकाऱ्यांनी सांगितले की, गृहमंत्री यांनी पैसे घेतले पण आज जर कोणी म्हटलं की या -या व्यक्तीने पैसे मागितले तर तुम्ही राजकीय जीवन उध्वस्त करणार का? असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला.

Ajit Pawar Nagpur Adhiveshan Speech : शिंदे,केसरकर, महाजन, गोगावले; दादांची फटकेबाजी,शेवट नक्की पाहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here