Accident News : साईबाबाच्या दर्शना आधीच कुटुंबावर काळाने घाला घातलाय. मुंबई- नाशिक महामार्गावरील येवई नाका येथे कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. यातून त्यांची तीन वर्षाची चिमुरडी बचावली आहे. मनोज जोशी (वय 34), आणि मानसी जोशी (वय 34) अशी भीषण अपघातात ठार झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. 

मुंबई- नाशिक महामार्गावरील येवई नाका जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गावरील अपघाताच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जोशी पती-पत्नीचा देखील याच महामार्गवरील अपघाताने बळी घेतला आहे. जोळी पती-पत्नी आणि त्यांची तीन वर्षाची चिमुकली भांडुपवरून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला दुचाकीवरून निघाले होते. यावेळी येवई नाका येथे त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात मनोज आणि मानसी यांच्या डोक्यावरून  भारधाव कंटेनरचे चाक गेले. यात पती-पत्नीच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, त्यांची तीन वर्षाची चिमुरडी या भीषण अपघातातून बचावली आहे. 

Accident News : नवीन वर्षाच्या तोंडावरच कुटुंबावर काळाचा घाला

नववर्षाच्या निमित्ताने मृत जोशी पती-पत्नी त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीला घेऊन आज सकाळच्या सुमारास दुचाकीवरून शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनाला मुंबई नाशिक महामार्गावरून निघाले होते. येवई गावाच्या हद्दीत असलेल्या नाक्यावर मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर काही क्षणातच भरधाव कंटेनर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. विशेष म्हणजे मृत पती-पत्नीने सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून डोक्यात हेल्मेट देखील घातले होते. मात्र त्या हेल्मेटचाही चक्काचूर होऊन पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावर काळी काळ वाहतूक कोंडी झाली होती. परंतु, पोलिसांनी वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. 

अपघाताच्या घटनेची माहिती मिळतात, भिवंडी तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा परून पोलिसांनी दोघांचेही मृतदेह भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी पाठवले. कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या भीषण अपघाताच्या घटनेचा अधिक तपास भिवंडी तालुका पोलिस करत आहेत. 

live reels News Reels

महत्वाच्या बातम्या

Mumbai Police : मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर, नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात रात्रभर ‘ऑपरेशन ऑल आऊट’   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here