shirdi crime news: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील विविध ठिकाणाच्या पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. मुंबईच्या गोरेगाव येथून आलेल्या द्वारकामाई पालखीमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास पुसद येथील एका तरुणाने पालखी सोबत आलेल्या साईभक्त तरुणावर गोळीबार केला. या घटनेत निलेश पवार नावाचा तरुण जखमी झाला. त्याच्या खांद्याजवळ गोळी लागली.

 

shirdi yatra
शिर्डी: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी राज्यभरातील विविध ठिकाणाच्या पालख्या शिर्डीमध्ये दाखल होत आहेत. मुंबईच्या गोरेगाव येथून आलेल्या द्वारकामाई पालखीमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास पुसद येथील एका तरुणाने पालखी सोबत आलेल्या साईभक्त तरुणावर गोळीबार केला. या घटनेत निलेश पवार नावाचा तरुण जखमी झाला. त्याच्या खांद्याजवळ गोळी लागली. त्याच्यावर शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरदिवसा पालखीतील तरुणावर गोळीबार झाल्याने शिर्डी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आज दुपारच्या सुमारास गोरेगाव येथील द्वारकामाई पालखी शिर्डीजवळील सावळी विहीर येथे नाश्त्यासाठी थांबली होती. त्या पालखीतील निलेश पवार नावाचा तरुण नाश्ता वाटत होता. तेव्हा आरोपीने त्याच्यावर दोन राऊंड फायर केले. जखमी निलेश पवार आणि आरोपी दोघेही राहणार पुसद जिल्हा यवतमाळचे असून जखमी पवार हा सध्या गोरेगावात वास्तव्यास आहे.
गर्लफ्रेंडला फिरवायला OLXवर बाईक शोधली; मालकाचं घर गाठलं अन् ‘भलताच’ गियर टाकला
मुंबईहून पालखी शिर्डीच्या दिशेनं जात असताना त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. पवारने दोन वर्षांपूर्वी आरोपीच्या बहिणीला पळवून नेऊन लग्न केलेले आहे. त्याचाच राग मनात धरून आरोपीने पालखीतून शिर्डीच्या दिशेने चाललेल्या निलेश पवार याच्यावर गोळीबार केला आहे. या प्रकरणी गावठी कट्ट्यासह आरोपीला शिर्डी पोलीसांनी ताब्यात घेतल असून शिर्डी पोलीस अधिक तपास करत आहेत.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here