नवी दिल्लीः राजधानी दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये सर्वात मोठे सेक्स रॅकेट चालवणारी कुख्यात गीता अरोरा उर्फ सोनू पंजाबनला ( ) दिल्लीच्या द्वारका कोर्टाने २४ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तर तिचा सहकारी संदीप याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

एका अल्पवयीन मुलीला बळजबरीने शरीर विक्रीच्या व्यवसायात ढकलल्याच्या आरोपावरून सोनू पंजाबनला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच वेळी, तिचा साथीदार संदीपने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल आणि तिला जबरदस्तीने शरीर विक्रीच्या व्यवसायात ढकलल्याबद्दल शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दिल्लीच्या द्वारका कोर्टाने अलिकडेच आणि तिचा साथीदार संदीप यांना दोषी ठरवले. दोषी ठरवल्यानंतर दोन दिवसानंतर तिहार तुरूंगात कैदेत असलेल्या चालाख सोनू पंजाबनने औषध घेऊन आत्महत्याचे नाटक केले होते. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले आणि आता ती पूर्णपणे बरे झाली आहे.

दिल्लीच्या नजफगड पोलिस ठाण्यात २०१४ मध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सोनू पंजाबन आणि त्याच्या सहा साथीदारांविरूद्ध अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने शारीर विक्रीच्या व्यवसायात ढकलल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पण नंतर या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.

दरम्यान, अल्पवयीन पीडित मुलगी भीतीमुळे बेपत्ता झाली होती. यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने पीडितेचा शोध घेतला आणि तिला सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. यानंतर, सन २०१७ मध्ये सोनू पंजाबन आणि तिचा साथीदार संदीप याला गुन्हे शाखेने अटक केली.

चालाख सोनू पंजाबन आणि संदीप यांच्यावर यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले गेले होते. ज्यामध्ये हे कनेक्शन मांडण्यात आले होते. यापूर्वीही सोनू पंजाबनला एका प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे. ती शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तिची ही शिक्षा जन्मठेपच मानली जाईल. शिक्षा सुनावताना कोर्टाने पीडित मुलीला ७ लाख रुपये देण्याचे आदेशही दिला.

मुलींना अशी ओढायची जाळ्यात

आधी मुलींशी कोणत्या ना कोणत्या बहाण्याने मैत्री करायची. मग त्यांना फिरवले जायचे. त्यांचे ब्रेन वॉश करण्यात यायचे. यानंतर त्यांना त्यांच्या शरीराची किंमत सांगितली जायची. हा व्यवसाय काही काळापुराताच चालतो. या व्यवसायाला दीर्घ आयुष्य नाही. एकदा हा व्यवसाय करून पाहा. नाही पटलं तर सोडून द्या. असं सांगून तरुणींना या शरीर विक्रीच्या दलदलीत हळूहळू फेकलं जायचं.

पीडित मुलीच्या जबाबाने अंगावर काटे

सोनू पंजाबनने आपल्याला अंमली पदार्थाचे सेवन करायला लावले आणि शरीर विक्रीच्या व्यवसायात ढकललं. सोनू पंजाबन १५०० रुपयांत तिचा सौदा करत होती. सतत जागा बदलवत होती. काही दिवसांनंतर पीडित मुलीला सोनू पंजाबनने लाला अंकल नावाच्या व्यक्तील विकले. त्यानेही पीडितेला शरीर विक्रीच्या व्यवसायात ढककलं. त्यानंतरही पीडित मुलीच्या विक्रीचा सिलसिला थांबला नाही. एकएक करून अनेक दलालांना तिला विकलं गेलं. शेवटी सतपाल या दलालाने तिला विकत घेतलं. त्यानेही तिचा वापर शरीर विक्रीच्या व्यावसायासाठी केला. यानंतर सतपाल याचा भाऊ राजपालने तिला आपल्या गावी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनी सतपालने पीडितेशी लग्न केलं. यानंतर पीडित मुलीने संधी शोधून २०१४ ला ७ फेब्रुवारीला तिथून पळ काढला. तिने थेट नजफगढ पोलीस ठाणं गाठलं आणि आपल्यावर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगितली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींविरोधात कारवाई सुरू केली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here