दिल्ली-मेरठ द्रुतगती मार्गावर वेगमर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी पंतला दोनदा दंड ठोठावला. २२ फेब्रुवारीला रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पहिल्यांदाच चलान जारी करण्यात आलं. त्यानंतर २५ मे रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास पंतच्या नावानं चलान फाडण्यात आलं. दोन्हीवेळा कारमध्ये पंत होता. मात्र दोन्हीवेळा त्यानं दंड भरला नाही.
पंतविरोधात कारवाई होणार?
ऋषभ पंतनं दोनवेळा मोटार वाहन कायदा १९८८ चं उल्लंघन केलं आहे. दोनदा चलान झाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला नोटीस पाठवली. नियमानुसार नोटीस मिळाल्यानंतर ७ दिवसांच्या आत वाहन चालवणाऱ्या व्यक्तीला नाव, पत्ता, वाहन परवाना क्रमांकसह अन्य माहिती द्यावी लागते. ही माहिती न दिल्यास ५०० रुपयांचा दंड किंवा ३ महिन्यांचा तुरुंगवास किंवा दोन्ही होऊ शकतं. हाच प्रकार दुसऱ्यांदा घडल्यास, दुसऱ्यांदा नोटीस जारी झाल्यास ६ महिन्यांचा तुरुंगवास किंवा १ हजारांचा दंड किंवा दोन्ही होऊ शकतं.
ऋषभ पंतच्या नावानं पोलिसांनी दोनवेळा नोटीस जारी केली. मात्र त्यानं नोटिशीला उत्तर दिलं नाही. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस पंतविरोधात ६ महिने तुरुंगवास किंवा १ हजारांचा दंड किंवा दोन्ही प्रकारची कारवाई करू शकतात.