अमरावती: पत्नीच्या बहिणीच्या विवाहित मुलीकडे शरीरसुखाची मागणी करणारा व आपले म्हणणे न ऐकल्यास आत्महत्येची धमकी देणाऱ्या नराधमाला पोलिसांनी गजाआड केले आहे. मधील पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून पोलिसांनी तक्रारीनंतर तातडीने कारवाई केली आहे. ( in Amravati )

पाहा:

शिरखेड ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील विवाहिता ही तिच्या मावशीची पतीची प्रकृती बरी नसल्याने तिला पाहण्यासाठी गेली होती. यावेळी आजारी असलेल्या मावश्याने अर्थात काकाजी याने पुतणीला दुसऱ्या खोलीत बोलाविले. तू जे तुझ्या पतीला देते ते मला दे, असे म्हणून शरीर सुखाची त्याने मागणी केली. या प्रकाराने तक्रारकर्ती विवाहिता हादरली. हा प्रकार घरातील अन्य सदस्यांना सांगणार असल्याचे तिने मावश्यास सुनावले. पुतणीच्या या पवित्र्याने भांबावलेल्या आरोपी मावश्याने असे झाल्यास आपण फाशी घेवून आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली. यामुळे तुझ्यासह सर्वजण फसणार असल्याचे तो म्हणाला. हा प्रकार घडल्यानंतर तक्रारकर्ती विवाहिता ही तिच्या सासूसह घरी निघून आली.

वाचा:

१९ जुलै रोजी सकाळी नऊ वाजताचे सुमारास याप्रकरणातील तक्रारकर्त्या महिलेचा मावसा तिच्या घरी आला. त्याने स्वत:जवळ बस असे म्हणून विवाहितेस तिच्या अंगावरील कपडे काढण्यास सांगितले. आपणास तुला तश्याच अवस्थेत पहावयाचे असल्याचे सांगून त्याने विवाहीतेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तू मला हवे ते न दिल्यास आपण जीवाचे कमी जास्त करणार असल्याचे सांगून सर्वांना फसविण्याची पुन्हा त्याने धमकी दिली. यानंतर मावसा विवाहितेच्या घरून निघून गेला. या दोन घटनांनंतर घाबरलेल्या विवाहितेने कुटुंबीयांना ही माहिती दिली. विवाहितेने नंतर कुटुंबीयांसोबत थेट शिरखेड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने पुढील कारवाई केली. विनयभंग करून महिलेचा छळ करणाऱ्या मावश्याविरोधात भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), ३५४ अ (२) व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. या नराधमाला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. याप्रकरणाचा तपास शिरखेडचे ठाणेदार केशव ठाकरे करीत आहेत.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here