Bhima Koregaon 1 January Preparation :  कोरेगाव भीमातील (koregaon bhima) जयस्तंभ अभिवादन सोहळ्याची तयारी शेवटच्या टप्प्यात आली आहे. कोरोनानंतर यंदा दोन वर्षांनी मोठ्या संख्येनं अनुयायी अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. याच सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. 

-जयस्तंभाकडे जाणाऱ्या अनुयायींची वाहने वगळून पुण्याकडून अहमदनगर बाजूकडे जाणारी वाहतूक ही खराडी बायपास येथून उजवीकडे वळून केशवनगर मुंढवा चौक, मगरपट्टा चौक, डावीकडे वळून पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुर मार्गे नगररोड जातील. 

-सोलापूर रोडवरून आळंदी, चाकण या भागात जाणारी वाहतूक हडपसर मगरपट्टा चौक येथे उजवीकडे वळून खराडी बायपासमार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी आणि चाकण येथे जाईल.

-मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी जड वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील. मुंबई येथून अहमदनगर बाजूकडे जाणारी हलकी वाहने (कार, जीप) वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूर मार्गे अहमदनगर जातील. 

live reels News Reels

-कोल्हापूर, सांगली, सातारा, कात्रज मार्गे मंतरवाडी फाटा, मगरपट्टा चौक येथून नगरकडे जाणारी वाहने हडपसर – पुणे सोलापूर महामार्गाने केडगाव चौफुला, न्हावरा, शिरुर मार्गे नगररोड अशी जातील. 

इंद्रायणी नदीवरील आळंदी – तुळापूर हा पूल 10 जानेवारी 2022 रोजी जड वाहनांनाकरीता बंद करण्यात आला असल्याने या ठिकाणाहून केवळ अनुयायांच्या हलक्या चारचाकी वाहनांना प्रवेश दिला जाईल. अनुयायांच्या जड वाहनांनी चाकण-शिक्रापूर मार्गाचा वापर करावा.

सोहळ्यासाठी वाहनतळे निश्चित 

जयस्तंभास अभिवादनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी वाहन पार्किंगस्थळेही निश्चित करण्यात आली आहेत. पार्किंगच्या ठिकाणापासून जयस्तंभापर्यंत जाण्यासाठी पीएमपीएमएल बसेसची सुविधा करण्यात आली आहे. त्यामुळे निश्चित करण्यात आलेल्या ठिकाणीच अनुयायांनी आपली वाहने पार्क करण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 

पुण्याकडून येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे:
कार पार्किंग- आपले घर शेजारी हनुमंत कंद यांचा प्लॉट तसेच संदीप सातव यांचा प्लॉट लोणीकंद, लोणीकंद बौद्धवस्ती शेजारी सागर गायकवाड यांचा प्लॉट, तुळापूर फाटा स्टफ कंपनी शेजारी मोकळा प्लॉट, सामवंशी अकॅडमी समोर थेऊर रोड, खंडोबाचा माळ

खासगी बस पार्किंग- आपले घर सोसायटीच्या मागील प्लॉट.

1 जानेवारीला पुणे आणि थेऊरकडून येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांची वर्दळ जास्त असल्याने लोणीकंद चौकात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून लोणीकंदकडून खंडोबा माळ आणि सामेश्वर पार्किंगकडे जाणारा मार्ग पीएमपीएमएल बसेस वगळता इतर वाहनांसाठी एकेरी राहील.

आळंदीकडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे:
कार पार्किंग- तुळापूर रोड वाय पॉईंट समोरील पार्किंग, फुलगाव सैनिकी शाळा मैदान

थेऊर, सोलापूरकडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे:
कार पार्किंग- खंडोबाचा माळ

अष्टापूर डोंगरगावडून येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगची ठिकाणे:
कार पार्किंग- पेरणे गाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील मोकळे मैदान

दुचाकींसाठी पार्किंगची ठिकाणे:
तुळापूर फाटा संगमेश्वर हॉटेलच्या मागे मेन चौक, टाटा मोटर्स शोरुमचे मोकळे मैदान, टाटा मोटर्स शोरुमशेजारील मोकळे मैदान, पेरणे पोलीस चौकी मागील मोकळे मैदान, ज्योतिबा पार्क गो शाळेच्या शेजारील प्लॉट.

2 COMMENTS

  1. I agree with your point of view, your article has given me a lot of help and benefited me a lot. Thanks. Hope you continue to write such excellent articles.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here