जालना : हॉटेलच्या जेवणात अळी, बारीक किडे किंवा इतर कीटक सापडल्याचे अनेकदा आपल्या कानावर येते. समाजमाध्यमात तसे व्हिडिओदेखील व्हायरल होतात. मात्र जालना शहरातील एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये वांग्याच्या भाजीत चक्क मेलेला उंदीर आढळला आहे. हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे संतापलेल्या ग्राहकांनी हॉटेल मालकाला खडे बोल सुनावत चांगलेच फैलावर घेतले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, आज दुपारच्या सुमारास सुरेश चंपालाल राका आणि शुभम राजू अक्कड या दोन मित्रांनी हॉटेलमध्ये जेवायचा बेत ठरवला. शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या आणि नावाजलेल्या हॉटेलमध्ये दोघे जेवायला गेले. छान, स्वादिष्ट जेवण मिळते म्हणून दोघांनी राईस प्लेटची ऑर्डर केली. गप्पाटप्पा सुरू असतानाच हॉटेल कर्मचाऱ्याने त्यांच्यासमोर राईस प्लेट ठेवली. मात्र या ताटावर ताव मारण्याच्या तयारीत असतानाच प्लेटमध्ये वाढण्यात आलेल्या वांग्याच्या भाजीत चक्क मेलेला उंदीर दिसला. त्यामुळे दोघांचाही पारा वाढला.

साखरपुड्यानंतर हळद लागण्याआधीच तरुणावर काळाची झडप, तर दुसरीकडे नववधूनेही गमावले प्राण!

प्लेट ठेवणाऱ्या वेटरच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर तर कहरच झाला. वेटरने उलट ग्राहकांसोबतच अरेरावीची भाषा वापरली आणि त्यावरून ग्राहक आणि वेटरमध्ये वाद झाला. या वादानंतर हॉटेल मालकही टेबलपर्यंत पोहोचले. मग काय ग्राहकांनी मालकाला चांगलेच फैलावर घेत या निष्काळजीपणाचा जाब विचारला. घडलेला प्रकार पाहून मालकांनी सारवासारव करत आपली चूक कबूल केली.

2 COMMENTS

  1. After reading your article, it reminded me of some things about gate io that I studied before. The content is similar to yours, but your thinking is very special, which gave me a different idea. Thank you. But I still have some questions I want to ask you, I will always pay attention. Thanks.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here