पुणे: शहरात बुधवारी सर्वाधिक चाचण्या झाल्या असतानाच जिल्ह्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद झाल्याने चिंता वाढली आहे. पुणे शहर जिल्ह्यात बुधवारी संसर्गाचे ३२१८ रुग्ण आढळले तर ६२ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, ८८३ रुग्ण हे बरे झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. ( Coronavirus in )

वाचा:

पुण्यात बुधवारी सर्वाधिक चाचण्या घेण्यात आल्या. आणि आरपीटीसीआर चाचण्यांची संख्या ७५९५ पर्यंत गेली. आतापर्यंत एकूण २ लाख २३ हजार ३९ एवढ्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. सध्या शहरात ६०९ गंभीर रुग्ण आहेत. त्यापैकी ९४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ५१५ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. शहरात सक्रीय रुग्णांची संख्या ही १६ हजार २६९ एवढी झाली आहे. सर्वाधिक ८८३ रुग्णांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आल्याने आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही २५ हजार १२९ पर्यंत पोहोचली आहे.

शहर जिल्ह्यात ६२ जणांचा बुधवारी मृत्यू झाला आहे. त्यात पुण्यातील ३३ जणांचा समावेश आहे तर मध्ये १८, पुणे ग्रामीण ६ आणि अन्य ठिकाणी ५ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता जिल्ह्यासह शहरात चिंताजनक स्थिती निर्माण झाल्याचे चित्र स्पष्ट आहे.

वाचा:

करोना अपडेट्स…

> मास्क न घालता सोसायटीत येणाऱ्यांना विचारणा केल्याचा राग आल्यामुळे त्यांनी एका व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार येथे घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आमित गजानन पाटील (वय ३९) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार गणेश पवार, कृष्णा लोखंडे, अजय घोडगे व आणखी एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे आंबेगाव येथील साईसमर्थ नगरी सोसायटीत राहतात. सोसायटीच्या पार्किंगमध्ये गणेश पवार यांच्या ओळखीचे दोन मित्र मास्क न घालता सोसायटीत आले. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांना मास्क न घातल्यामुळे हटकले. त्याचा राग आरोपींना आला. गणेश पवार आणि त्याच्या मित्रांनी तक्रारदार यांना शिवीगाळ करून हाताने व लाथाबुक्क्यांनी तोंडावर पाठीवर मारहाण केली. तसेच, तक्रारदार यांच्या डोळ्यावर मारहाण केली. आरोपी कृष्णा लोखंडे याने पार्कींगमधील बांबू घेऊन तक्रारदार यांच्या पायावर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले.

वाचा:

> करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पथारी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले असून २४ जुलैपासून सर्व व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पथारी व्यावसायिक पंचायतीने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली आहे.

> करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या खासगी हॉस्पिटलकडून होणारी लूटमार कधी थांबणार? त्यांच्या बिलांचे ऑडिट करण्याची प्रक्रिया सरकार कधी पूर्ण करणार, अशी विचारणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here