Maharashtra Politics | राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा शुक्रवारी समारोप झाला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टोले लगावले. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगताना दिसले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भाषणं चर्चेचा विषय ठरली.

हायलाइट्स:
- आदित्य ठाकरे यांनीही सरकारला लक्ष्य केले होते
- देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
दरम्यान, हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगताना दिसले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणात बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. ज्या प्रबोधनकारांनी कर्मकांडाचा विरोध केला, त्यांचे वारस लिंबू फिरवण्याची भाषा करत आहेत. मी वर्षा या शासकीय बंगल्यात गेलो तेव्हा तिकडे पाटीवर लिंबू होते,’ असा खळबळजनक दावा करत मुख्यमंत्री शिंदे यांनी केला. तसेच उद्धव यांना उद्देशून हिऱ्यापोटी गारगोटी असा शब्दप्रयोगही मुख्यमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गटात नव्याने वाकयुद्ध पेटण्याची शक्यता आहे.
अजित पवारांची टीका
अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी एकाही मुद्द्यावर ठोस आणि समाधानकारक उत्तर दिले नाही. सगळे काही निर्लज्जासारखे चालले होते, हे भयावह आहे’, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रपरिषदेत केली. महापुरुषांचा अवमान, भ्रष्टाचाराचे आरोप, पोलिस कारवाईवरून विरोधी पक्षाने अतिरेक केला तरी, विदर्भाला न्याय देण्यासाठी कामकाज करण्यात यशस्वी झाल्याचे समाधान मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले. आम्ही सभागृहात मंत्र्यांच्या विरोधात घोटाळ्यांचे पुरावे दिले. राजीनाम्याच्या मागणीसाठी सभागृहात आणि बाहेरही संघर्ष केला. मात्र, निर्लज्ज सरकारने याची साधी दखलही घेतली नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.