Accident in Gujarat | नववर्षाच्या पूर्वसंध्येला गुजरातमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. नवसारी जिल्ह्यातील एका गावानजीक लक्झरी बस आणि कारची भीषण धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की कारचा पूर्णपणे चेंदामेंदा होऊन त्यामध्ये बसलेल्या ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर लक्झरी बसमधील १७ प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे.

 

Car accident
गुजरातमध्ये भीषण अपघात

हायलाइट्स:

  • ही बस अहमदाबादहून वलसाडच्या दिशेने जात होती
  • एकाच फटक्यात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा
अहमदाबाद: गुजरातच्या नवसारी परिसरात शनिवारी पहाटे लक्झरी बस आणि कारची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला असून ३२ जण जखमी झाले आहेत. या जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, धडकेनंतर कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला आहे. तर लक्झरी बसच्या पुढच्या भागाचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये कारमधील ९ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर जोरदार धडक बसल्याने लक्झरी बसमधील जवळपास ३२ प्रवाशी जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, ही बस अहमदाबादहून वलसाडच्या दिशेने जात होती. बस राष्ट्रीय महामार्गावरुन मार्गक्रमण करत असताना नवसारी जिल्ह्यातील वेसवा गावानजीक समोरून येणाऱ्या फॉर्च्युनर कारने बसला टक्कर दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, एकाच फटक्यात कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला. या अपघातावेळी खूप मोठा आवाज झाला. त्यामुळे स्थानिक लोक घटनास्थळी धावत आले. स्थानिकांनी पोलिसांना वर्दी दिल्यानंतर तेदेखील घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्याला सुरुवात झाली.

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने कार आणि बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढले. या जखमींना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी नऊ जणांना मृत घोषित केले. हे सर्वजण फॉर्च्युनर गाडीतून प्रवास करत होते. प्राथमिक माहितीनुसार, विरुद्ध दिशेने येत असलेली फॉर्च्युनर कार दुभाजक पार करून लक्झरी बसला येऊन धडकली. कारच्या चालकाला डुलकी लागल्यामुळे त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यावेळी कार अत्यंत वेगात होती. अपघातामध्ये जखमी झालेल्या ३२ प्रवाशांपैकी १७ जणांची प्रकृती गंभीर आहे. या सर्वांना वलसाड रुग्णालयात हलवण्यात येणार आहे. तर उतर उर्वरित १४ जणांवर नवसारी येथे उपचार सुरु आहेत. पोलीस या अपघाताची पुढील चौकशी करत आहेत.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Get India news, latest marathi news headlines from all states of India. Stay updated with us to get latest India news in marathi.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here