अमरावतीः पत्नीकडून सतत होणारा मानसिक त्रास व चारित्र्यावरील संशयाला कंटाळून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेस दोन महिन्याचा कालावधी उलटल्यानंतर पोलीसांनी आता पतीच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पवन गणेशराव श्रीराव (३५, रा. यशोदानगर गल्ली क्र. २) असे गळफास घेणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

पवन श्रीराव याचा विवाह वलगांव येथील युवतीचा १० जुलै २०१८ रोजी झाला होती. पवनची पत्नी ही लहान-सहान कारणावरून पती पवनसोबत भांडण करीत होती. त्याला वारंवार पैश्याची मागणी करत होती. पतीचे परस्त्रीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय ती घेत होती. पवनच्या चारित्र्यावर सतत संशय घेतला जात असल्याने तो वैतागला होता. गेल्या दोन तीन महिन्यापासून पवनची पत्नी ही बेडरूममध्ये तिच्या आईसोबत झोपत होती. पवन याला आपल्या बेडरूममध्ये येऊ देत नव्हती. त्याला हॉलमध्ये झोपण्यास भाग पाडत होती, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पवनकडे त्याच्या पत्नीनं शेत तिच्या नावावर करून देण्यासाठी तगादा लावला होता. २४ मे रोजी तिचे पवन सोबत जोरदार भांडण झाले होते. भांडणानंतर रागात ती वलगांव येथे माहेरी गेली होती. माहेरी जाताना तिने पवनला मला भेटायचा प्रयत्न करु नकोस, ज्या दिवशी मरशील त्याच दिवशी तुझे तोंड पाहिन, अशी धमकी दिली होती.

वाचा:

पत्नीच्या नेहमीच्या भांडणाला व मानसिक त्रासाला कंटाळून अखेर पवन श्रीराव याने आत्महत्या केली. पोलीसांनी याप्रकरणी सुरुवातीला आकस्मिक मृत्युची नोंद केली. परंतु तपासात पवनच्या आत्महत्येस त्याची पत्नी जबाबदार असल्याची बाब पुढे येताच पोलीसांनी तिच्याविरूध्द भादंविच्या कलम ३०६ अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कानपुरे करीत आहेत.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here