Sharad Pawar : आपल्या देशातील 56 ते 60 टक्के लोक शेतीवर (Agriculture) अवलंबून आहेत. येणाऱ्या वर्षात चांगला पाऊस (Rain) झाला तर हे वर्ष चांगलं जायला काही हरकत नसल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  (Sharad Pawar) यांनी केलं. शेती संपन्न झाली तर बहुसंख्य लोकांची क्रयशक्ती वाढते. शेतकऱ्यांच्या हातात पैसा गेल्यामुळं बाजारात जाऊन खरेदी करण्याची त्यांची ताकद वाढते. या नवीन वर्षात बळीराजा सुखी व्हावा, हीच प्रार्थना असल्याचे पवार म्हणाले. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बारामतीत आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.  

नवीन वर्षात आव्हान काय असणार?

बळीराजा यशस्वी झाल्यानंतर देशातील अन्य घटकांचे दिवसही चांगले येतात. त्यासाठी व्यापार उद्योगातही चांगले दिवस येणं गरजेचं असल्याचे शरद पवार म्हणाले. देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत देश हा महत्वाचा निर्यातदार देश होऊ शकतो. त्यासाठी पहिल्यांदा उद्योग आमि व्यापारामध्ये सुधारणा झाल्या पाहिजेत असे शरद पवार म्हणाले. आज सत्तेवर कोणाही असो, अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वांना रजकीय मतभेत सोडून एकत्र यावं लागेल. अर्थव्यवस्था नीट करावी लागेल असे शरद पवार म्हणाले. देशाचे अर्थकारण सुधारण्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे, हे आपल्यापुढं नवीन वर्षात आव्हान असल्याचे शरद पवार म्हणाले. या आव्हानाला आपण सर्वजण सामोरं जाऊया असे पवार म्हणाले.

आम्हा विरोधकांना आता विचार करावा लागेल

संसदेचं  हिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षांना बोलू दिलं जात नाही. सभागृहात गोंधळ करायचा. या गोंधळात हव्या त्या गोष्टी मंजूर करुन घ्यायच्या अशी केंद्र सरकारची भूमिका असल्याचे शरद पवार म्हणाले. हे चित्र याआधी कधी पाहायला मिळाले नव्हते असे शरद पवार म्हणाले. हे किती दिवस चालणार याचा विचार आम्हा विरोधकांना बसून करावा लागेल असेही शरद पवार म्हणाले. त्यासाठी जानेवारीच्या शेवटी सर्व विरोधी पक्ष आम्ही एकत्र बसणार असल्याचंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं. संसदेचं अधिवेशन सुरु होण्याच्या आधी आम्ही चर्चा करणार असल्याचं पवारांनी सांगितले. या महत्वाच्या काळात सत्ताधारी पक्षान राष्ट्राच्या हिताचा विचार करावा. संसदेचा सन्मान राखला पाहिजे असेही पवार म्हणाले.

सत्तेचा गैरवापर होतोय  

सत्तेचा गैरवापर होतोय हे आम्ही सातत्याने सांगत आहोत. शिवसेना खासदार संजय राऊत आणि  राष्ट्रावदीचे नेते अनिल देशमुख तसेच इतर सहकारी यांच्याबाबत सत्तेचा गैरवापर झाल्याचे शरद पवार म्हणाले. ज्यांना जामीन मिळाला आहे त्यांना न्यायदेवतेने सांगितले की जामीन हा हक्क आहे. ज्या प्रकरणात अटक केली आहे त्यात काही तथ्य नसल्याचे न्यायदेवतेने सांगितले. असतात. त्यामुळं सत्तेचा गैरवापर करुन लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्याचे काम झाले असे पवार म्हणाले. 

live reels News Reels

महत्त्वाच्या बातम्या:

Kirit Somaiya On sharad Pawar : शरद पवार यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं; किरीट सोमय्यांकडून कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here