Mumbai Water Supply: घाटकोपर (Ghatkopar) येथील असल्फा पाईपलाईन विभागात ब्रिटिशकालीन 72 इंचाची जलवाहिनी रात्रीच्या सुमारास फुटली. जलवाहिनी फुटल्यानंतर घाटकोपरमधील रस्त्यांवर पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली होती. जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असून काही भागातील पाणीपुरवठा बंद करण्यात (Water Supply stopped in BMC N Ward)आला आहे. 

घाटकोपर उच्चस्तर जलाशयास पाणीपुवठा करणारी 72 इंच व्यासाची जलवाहिनी चांदिवली ब्रिज जवळ अचानक फुटली. घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयातून होणारा पाणीपुरवठा जलवाहिनी दुरुस्त होईपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. जलावाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून एन विभागातील काही ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. दरम्यान. जलवाहिनी फुटल्यानंतर रस्ता खचला आहे. 

या विभागातील पाणीपुरवठा राहणार बंद 

एन विभागः  घाटकोपर उच्चस्तर जलाशय – राम नगर, हनुमान नगर, राहुल नगर, कैलास नगर, संजय गांधी नगर, शंकर मंदीर, जय मल्हार नगर, शिवाजी नगर, आंबेडकर नगर, निरंकारी सोसायटी, वर्षा नगर, ए व बी कॉलनीचा काही परिसर, डी व सी म्युनिसिपल कॉलनी, रायगड विभाग, आनंदगड, यशवंत नगर, गावदेवी, पठाण चाळ, अमृत नगर, इंदिरा नगर 1 आणि 2, अमिनाबाई चाळ, गणेश मैदान, मौलाना कंपाऊंड, हरिपाडा, जगदुषा  नगर, कठोडीपाडा, भीमानगर, अल्ताफनगर, गेल्डानगर, गोळीबार मार्ग, नवीन दयासागर, जवाहरभाई प्लॉट, सेवानगर, ओ. एन. जी. सी. कॉलनी, माझगाव डॉक  कॉलनी, गंगावाडी गेट नंबर 2, सिद्धार्थ नगर, आंबेडकर नगर, साईनाथ नगर, पाटीदार वाडी, रामाजी नगर, भटवाडी, बर्वेनगर, काजू टेकडी, अकबरलाला कंपाऊंड, आझादनगर, पारसी वाडी, सोनिया गांधी नगर, खाडी मशीन, गंगावाडीचा काही परिसर या ठिकाणी पाणीपुरवठा बंद राहणार आहेत. 

जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या संबंधित परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे व महानगर पालिकेस सहकार्य करावे असे आवाहन एन प्रभागाचे सहाय्यक अभियंता यांनी केले आहे. 

live reels News Reels

मध्यरात्रीच्या सुमारास फुटली जलवाहिनी

मध्यरात्री 2 ते 2.30 पर्यंत पाण्याची पाईपलाईन फुटली असल्याची माहिती मुंबई महापालिकेला कळविण्यात आली, मात्र, पालिकेचे अधिकारी गैरहजर असल्याचे स्थानिकांनी सांगितले. काही वेळेनंतर मुंबई महापालिकेचे कर्मचारी, अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अनेक घरे, परिसर आणि रस्ते जलमय झाली होती. ही जलवाहिनी ब्रिटिशकालीन असून जीर्ण झाली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here