अमरावती : महापुरुषांचा जिल्हा म्हणून परिचित असणारा अमरावती जिल्हा आता महाराष्ट्र शासनाच्या अवयव दान चळवळीतही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रीन कॉरिडोर दरम्यान एका ‘ब्रेन डेड’ महिलेने आपले तीन अवयव दान करत मरावे परी कीर्तिरूपे उरावे हा संदेश पुन्हा अधोरेखित केला आहे.

जिल्ह्यातील परतवाडा येथील ६५ वर्षीय महिला बिना खटवानी या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना अचानक हात पायाची हालचाल करता येत नसल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना अमरावती येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉ. सिकंदर हरवानी यांनी त्यांच्या काही चाचण्या केल्या आणि त्यातून त्यांच्या मेंदूतील तीन नस ब्लॉक असल्याची माहिती समोर आली. दोन दिवस हातापायांची हालचाल न केल्याने डॉक्टरांनी त्यांच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन त्या पूर्णतः कोमात गेल्या असून त्या बाहेर येण्याची शक्यता फारच कमी असल्याची माहिती दिली.

एका गुणाने मुंबईचा थरारक विजय; मिळवले राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद
यावर डॉ. सिकंदर अडवाणी यांनी त्यांच्या कुटुंबियांना अवयव दान या संकल्पनेविषयी समजून सांगितलं. त्यावेळी बिना खटवानी यांचा मुलगा विकी खटवानी यांनी कुटुंबाला विश्वासात घेऊन ‘ब्रेन डेड’ झालेल्या आईचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि क्षणातच कागदोपत्री प्रक्रिया सुरू झाली. डॉ. सिकंदर अडवाणी यांच्याकडून झोनल ट्रान्सप्लांट कमिटीला कळविण्यात आले. ही समिती रुग्णालयात दाखल झाली आणि त्यांनी रुग्ण महिलेची एफनिया टेस्ट केली.

या टेस्टमधून तथ्य समोर आल्यानंतर त्यांनी रात्रभर त्यांचा बीपी मेंटेन केला. दुसऱ्या दिवशी पहाटे ऑर्गन डोनेशनची टीम आली आणि त्यांनी हे अवयव काढलेत. डॉ. हरवानी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन किडनी व एक लिव्हर असे अवयव या महिलेने दान केले असून एलेक्सा हॉस्पिटल व नागपूर येथील होक हार्ड हॉस्पिटल येथे हे अवयव नोंदणी केलेल्या रुग्णांना देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाने सध्या अवयव दान चळवळ सक्षम करण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलली आहेत. त्याचीच बीजे अमरावतीत रुजली असून डॉक्टर आणि सामाजिक भान असलेल्या नागरिकांच्या समन्वयातून दिवसागणित अवयव दान करणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

एका गुणाने मुंबईचा थरारक विजय; मिळवले राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here