SSC HSC Exam: दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी काही कारणास्तव वेळेत परीक्षा फॉर्म (Examination Form) भरू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. कारण अशा विद्यार्थ्यांसाठी दहावी बारावी बोर्डाने (SSC HSC Board) या दोन्ही परीक्षांपूर्वी दोन दिवस अगोदरपर्यंत अतिविलंब शुल्क, विशेष अतिविलंब शुल्क आणि अतिविशेष अतिविलंब शुल्क भरून फॉर्म भरण्याची संधी देण्यात आली आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी नियमित शुल्क व विलंब शुल्कासह आवेदनपत्र स्वीकारण्याची मुदत संपुष्टात आली आहे. पण अनेकजण या काळातही परीक्षा फार्म भरू शकले नाहीत, आशा विद्यार्थ्यांसाठी ही संधी देण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात बारावी तर मार्च महिन्यात दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यासाठी दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी नियमित तसेच विलंब शुल्कासह परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत 7 डिसेंबर आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी 2 डिसेंबरपर्यंतच मुदत होती. मात्र अनेकांना या मुदतीत परीक्षा फॉर्म भरता आला नाही. आता अशा विद्यार्थ्यांसाठी श्रेणी, तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होण्यापूर्वी 30 दिवसांचा कालावधी वगळून प्रति दिन 50 रुपये अतिविलंब शुल्क भरून आवेदनपत्र सादर करता येणार आहे.
असे असणार शुल्क!
अतिविलंब शुल्काच्या मुदतीनंतर लेखी अथवा तोंडी परीक्षेपैकी जी परीक्षा अगोदर असेल, त्यापूर्वी 15 दिवस अगोदरपर्यंत प्रती विद्यार्थी प्रति दिन 100 रुपये याप्रमाणे विशेष अतिविलंब शुल्कासह आवेदनपत्र भरता येणार आहे. तर यानंतर 15 दिवसांत परीक्षेच्या आदल्या दिवसांपर्यंत प्रति विद्यार्थी प्रति दिन 200 रुपये अतिविशेष अतिविलंब शुल्कासह विद्यार्थी आवेदनपत्र भरू शकतात.
News Reels
परीक्षा | अतिविलंब शुल्क | विशेष अतिविलंब शुल्क | अतिविशेष तिविलंब शुल्क |
दहावी | 20 डिसेंबर ते 20 जानेवारी | 21 जानेवारी ते 12 फेब्रुवारी | 13 फेब्रुवारी ते 01 मार्च |
बारावी | 19 डिसेंबर ते 12 जानेवारी | 13 जानेवारी 03 फेब्रुवारी | 04 ते 20 फेब्रुवारी |
दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 21 फेब्रुवारी 2023 ते 21 मार्च 2023 या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा होणार आहे. तर 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या कालवधीत दहावीची लेखी परीक्षा होणार आहे. ज्यात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळाकडून दहावी व बारावीची परीक्षा घेण्यात येणार आहे.
SSC HSC Exam Timetable : दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI