उन्नाव: उत्तर प्रदेशच्या उन्नावमध्ये वास्तव्यास असलेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुलीकडच्यांनी सासरच्या व्यक्तींवर खुनाचा आरोप केला आहे. विवाहितेच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. तपास सुरू असून साक्षी, पुराव्यांच्या मदतीनं योग्य कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.

शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास आम्ही मुलीला नेण्यासाठी आलो. मात्र सासरच्या मंडळींनी पाठवलं नाही. त्यानंतर आम्ही संध्याकाळी ४ वाजता फोन केला. तेव्हा तुमच्या मुलीनं विष खाल्ल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं, अशी माहिती मुलीचे वडील उदयभान अवस्थी यांनी दिली. आम्ही दुसऱ्यांदा त्यांच्या घरी गेलो, तेव्हा दार बंद होतं. आम्ही कसाबसा दरवाजा उघडला. त्यानंतर मी आणि मुलानं तिला घेऊन रुग्णालय गाठलं, असा घटनाक्रम अवस्थी यांनी कथन केला.
अरेरे! दोन मित्र, कायम एकमेकांसोबत; एकाच बँकेत कामाला लागले; मृत्यूनंही एकाचवेळी गाठले
सासरचे लोक मुलीला उपचारांसाठीदेखील घेऊन गेले नाहीत, असा आरोप आहे. माहेरच्या मंडळींनी मुलीला बेशुद्धावस्थेत कब्बाखेडा येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल केलं. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मुलीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. रडून रडून त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली आहे.

नवविवाहितेचा विष खाऊन मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कुटुंबीयांकडून घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. सासरचे लोक मुलीला माहेरी पाठवत नव्हते. तिला मोलकरणीसारखे वागवायचे. या प्रकरणी एकदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मग काही दिवस सर्व ठीक सुरू होतं. मात्र त्यानंतर तिला विष देऊन मारण्यात आल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला.
मम्मीने पाय पकडले, अंकलने पप्पांचा गळा दाबला; निष्पाप मुलांनी सारंच सांगितलं; पोलीस सुन्न
जावयानं मुलीला विष दिलं. घटनेच्या एक दिवस आधी मुलीला मारहाण करण्यात आली होती. आम्ही एफआयआर दाखल केलेला आहे. शवविच्छेदनानंतर आम्ही मुलीचं पार्थिव घरी आणल्याचं वडील म्हणाले. घटनेची माहिती मिळताच उन्नाव शहराचे सर्कल ऑफिसर आशुतोष कुमार घटनास्थळी पोहोचले. या प्रकरणात योग्य कारवाई करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं.

1 COMMENT

  1. I pay a quick visit each day some web pages and websites to readarticles or reviews, except this weblog gives quality based content.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here