Nagpur Roundup 2022 : नागपूर शहराच्या विकासाला गती देणारे अनेक प्रकल्प 2022मध्ये मिळाले. या प्रकल्पांमुळे शहरासह विदर्भाच्या विकासाचीही गती वाढणार आहे. तसेच नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यातही अकरा प्रकल्पांचे गिफ्ट मिळाले आहे. समृद्धी महामार्गाचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाल्यानंतर त्यांनी समृद्धी महामार्गावर झीरो पॉइंट ते टोल प्लाझा असा 10 किलोमीटरचा प्रवास केला.

समृद्धीचे लोकार्पण आणि नवा इकॉनॉमिक कॉरिडॉर

11 डिसेंबर हा दिवस महाराष्ट्र आणि नागपूरकरांसाठी अविस्मरणीय ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 701 किलोमीटर लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण नागपुरातून झाले. नागपूर- शिर्डी या 520 किमीच्या पहिल्या टप्प्यासह 11 विविध योजनांचे लोकार्पण व भूमिपूजनाचा सोहळा अविस्मरणीय ठरला. नागपूर येथील झिरो पॉइंट या ठिकाणावरून विदर्भ, मराठवाडा व विदर्भातील दुर्गम भागांचे मुंबईपासून अंतर कमी करण्यासाठी या महामार्गाची निर्मिती करण्यात आली. एक नवा इकॉनॉमिक कॉरिडॉर उभारण्याचा हा प्रयत्न 2022 या वर्षात प्रत्यक्षात साकारण्यात आला.

नाग नदी शुद्धीकरण प्रकल्पाबद्दल…

live reels News Reels

नाग नदीचे उगम अंबाझरी तलावातून होतो. नाग नदीची एकूण लांबी 68 किमी आहे. शहरी भागात नाग नदीची लांबी 15.68 किमी आहे. नाग नदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत नवे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (Sewage Treatment Plant) STP 92 एमएलडी (MLD) क्षमता असलेले तयार करण्यात येतील. तर ‘STP’ (10 एमएलडी क्षमता असलेला) अद्ययावत (अपग्रेडेशन) करण्यात येईल. नविन 4 पम्पिंग स्टेशनची निर्मिती करण्यात येईल. प्रकल्पामध्ये 107 ‘मॅनहोल’ वळण असणार (मॅनहोल डायव्हर्सन) आहे. 48.78 किमी इंटरसेप्टर सीवर (नाग नदी व पिवळी नदी वर) तयार करण्यात येतील. उत्तर झोन मध्ये 247.9 किमी सीवर लाईन तसेच मध्य झोन मध्ये 211.60‍ किमी सीवर लाईन बदलण्यात येणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नाग नदी, बोरनाला आणि पिवळी नदीचा पाण्याची गुणवत्ता सुधरेल असा यंत्रणेला विश्वास आहे. हा प्रकल्प 2049 वर्षांपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. नद्यांच्या पाण्यातील प्रदुषणाचे स्तर कमी होण्यास मदत होणार आहे.

राज्याच्या विकासात हे प्रकल्प मैलाचा दगड ठरणार…

हिंदूहृदयसम्राट बाळासाहब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या (Samruddhi Mahamarg Starting Point Nagpur) पहिल्या टप्प्याचे लोकार्पणासह, नॅशनल इस्टिट्यूट ऑफ वन हेल्थ केंद्र, रक्तसंबंधीत रोगांवरील अनुसंधान केंद्र (ICMR Research Centre)-चंद्रपूर, पेट्रो केमिकल महत्त्वाचे केंद्र-चंद्रपूर, नागपूर नाग नदी प्रकल्पाच्या विकास (Nag River) आणि स्वच्छतेचा प्रकल्प, नागपूर मेट्रोच्या (Nagpur Metro) फेज एकचे लोकार्पण आणि दुसऱ्या फेजचे भूमिपूजन, नागपूर ते बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेसला (Vande Bharat Express) हिरवा झेंडा, नागपूर आणि अजनी रेल्वे स्थानकाचा पुर्नविकास प्रकल्प, अजनी येथे 12 हजार हॉर्सपावर क्षमतेच्या रेल्वे इंजिन मेनटेंनस डेपो निर्मिती, रेल्वेच्या कोली नरकेट प्रकल्पाचे उद्घाटन ही सुमारे 75 हजार कोटींच्या 11 विकास प्रकल्पाचे उद्घाटन/ लोकार्पण केलं. 

ही बातमी देखील वाचा…

सुट्ट्यांमध्ये बघावी अशी नागपूर जवळील धार्मिक स्थळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here