वाचा:
करोनारुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासनाला संप्रदायाच्या मठांचा मोठा आधार मिळाला असून शहरातील ३०० पेक्षा जास्त मठ ताब्यात घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मठांमध्ये नगरपालिकेच्या वतीने गाद्या पाठवण्यात येत असून अशा मठांतून तब्बल तीन हजार नागरिकांना क्वारंटाइन करण्याची व्यवस्था प्रशासनाने करून ठेवली आहे. सध्या शहरातील संत गजानन महाराज मठ, तनपुरे महाराज मठ याशिवाय अनेक मठांत अनेक कुटुंबांना क्वारंटाइन ठेवण्यात आले असून जशी गरज भासेल तसे इतर मठांत नागरिकांना पाठवण्यात येणार आहे.
वाचा:
करोना संकटामुळे आषाढी यात्रा न भरविण्याचा निर्णय योग्यच होता हे पंढरपुरातील सद्याच्या स्थितीवरून स्पष्ट झाले आहे. सध्या शहर व तालुक्यात जवळपास २५० करोना बाधित रुग्ण असून रोज सरासरी दीडशेच्या आसपास नागरिकांच्या तपासण्या सुरू करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे प्रशासनाने नागरिकांना स्वयंशिस्त पाळण्याची विनंती केली आहे. सध्या संचारबंदी नसली तरी जे नागरिक कामानिमित्त बाहेर पडत आहेत त्यांनी समाजाची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी केले आहे
दरम्यान, पंढरपुरात करोनाचा समूह संसर्ग टाळण्यासाठी तातडीने संचारबंदी जाहीर करण्याची मागणी मनसेचे दिलीप धोत्रे यांनी केली आहे. करोना रुग्णावरील उपचारासाठी लागणारी औषधे, इंजेक्शन्स याच्या चढ्या भावात होणाऱ्या विक्रीवरही जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी धोत्रे यांनी केली आहे.
वाचा:
स्टेट बँक शाखा बंद
शहरातील स्टेट बँकेतील कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाल्याने बँक बंद करण्यात आली असून सर्व कर्मचाऱ्यांच्या तपासणीला सुरुवात झाली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वॅब घेण्यात येत असून गेल्या काही दिवसांत बँकेत आलेले ग्राहकही धास्तावले आहेत.
३१ जुलैपर्यंत सोन्या-चांदीची दुकाने बंद ठेवणार
पंढरपुरात करोना संसर्गाचा वाढत धोका पाहून शहरातील सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांनी २४ ते ३१ जुलैपर्यंत आपली सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सराफ असोसिएशनचे अध्यक्ष महावीर गांधी यांनी सांगितले. सध्या शहरातील परिसर, गांधी रोड, नाथ चौक परिसरात करोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडू लागले आहेत अशावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पंढरपूरमध्ये अजूनही संचारबंदी लागू केलेली नाही. आता प्रशासनाला मदत म्हणून सराफ असोसिएशन दुकाने बंद ठेवण्यासाठी पुढे आले आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times