Nashik Year End 2022 : कोरोनाचे (Corona) मळभ हळूहळू दूर होत होते, अन् नाशिककर (Nashik) नव्या उमेदीची सकाळ अनुभवत होते. त्यानंतर नाशिककरांनी मागे वळून पहिले नाही. कोरोनात अनेकांना गमावल्यानंतर 2022 च्या सुरवातीला नाशिककर एकत्र येऊ लागले. आणि अशा पद्धतीने हसत खेळत गणपती, नवरात्री, दिवाळी उत्सवही साजरे केले. बस अपघात सोडला तर नाशिककरांनी यंदाचे वर्ष खेळीमेळीत घालवल्याचे दिसून आले. 

2022 या सरत्या वर्षाला (Year Ender 2022) निरोप देण्यासाठी सर्व नाशिककर सज्ज झाले असून नवे वर्ष साजरे करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. कोरोनाच्या दोन वर्ष नवे वर्ष व सरत्या वर्षाला निरोप देता आला नाही. मात्र यंदा सर्व निर्बध मोकळे असल्याने सर्वचजण आपापल्या परीने थर्टी फस्ट साजरा करत आहे. दरम्यान या सरत्या वर्षाचा आढावा घेणं महत्वाचं आहे. 2020 व 2021 या वर्षांनी जगभरात धुमाकूळ घातला. जगातला कोणताही नागरिक या दोन वर्षातील अनुभव विसरणार नाही. तसेच काहीस नाशिककरांसमवेत झाले. या दोन वर्षात नाशिककरांनी अनेकांना गमावलं. नाशिककरांची एकजूट पाहिली. तर अनेकांना कटू अनुभवही आले. मात्र २०२२ उजाडलं ते मोकळेपणाने हिंडण्याचे स्वातंत्र्य, एकमेकांना भेटण्याचे स्वातंत्र्य. 

2022उजाडलं आणि नाशिककरांनी मोकळा श्वास घेण्यास सुरवात केली. अनेकांनी गेली दोन वर्ष मास्क परिधान केले होते, ते एका कोपऱ्यात पडले. आणि नाशिककरांनी शहरात फेरफटका मारण्यास सुरवात केली. ती आजही अबाधित आहे. नाशिककर मोकळे झाल्यानंतर खऱ्या अर्थाने बाजाराला झळाळी मिळाली. कारण कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बसले. त्यामुळे नाशिकची अर्थव्यवस्था डबघाईला आली होती. मात्र मलाबी दूर झाल्यानंतर सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले. अनेकांनी नवे जॉब शोधले, काहींनी व्यवसाय थाटला. त्यामुळे साधारण जानेवारी, फेब्रुवारी पर्यंत सर्व नाशिककरांनी शहर पालथं घातलं, अन् पाहिल्याप्रमाणे आयुष्य सुरु झाल्याचा फील आला.  

दरम्यान मार्च मध्ये नाशिक मनपाची मुदत संपुष्ठात आल्याने प्रशासक नेमण्यात आले. त्यानंतर काही दिवसांनी मनपा निवडणूक होणार अशी चिन्हे निर्माण झाली. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार सज्ज झाले. मात्र आरक्षणाचा तिढा सुटला नसल्याने निवडणुका बारगळल्या. आणि काही दिवसांनंतर निवडणुका होणारच असा ठाम निर्णय झाला. मग आरक्षणाचा तिढा सुटला, अधिसूचना निघाली. आरक्षण सोडतही जाहीर करण्यात आली. त्यामुळे आता निवडणूक होणारच अशी भावना असताना पुन्हा एकदा निवडणुका बारगळल्या, त्या आजपर्यत झाल्या नाहीत. 

live reels News Reels

त्यानंतर दोन वर्ष बंद असलेला गणपती उत्सव एकदम जोरात झाला. गणपती उत्सव काळात प्रचंड गर्दी नाशिक रस्त्यांवर पाहायला मिळाली. या काळात पावसाने देखीक नाशिककरांना हैराण केले. जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती पाहायला मिळाली. त्यानंतर नवरात्रीमध्ये देखील नाशिककरांनी दांडियाचा पुरेपूर आनंद घेतला. तर दिवाळीत सर्वाधिक खरेदी नाशिककरांनी केल्याचे समोर आले. ऐनवेळी मेनरोड बंद करत गर्दीचे नियोजन करावे लाग,ए एवढी प्रचंड गर्दी कोरोनानंतर नाशिककरांनी अनुभवली. एकूणच यंदाचे हे वर्ष अतिशय खेळीमेळीत नाशिककरांसाठी गेल्याचे दिसून आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here